रुग्ण हक्क परिषदेच्या शिवाजीनगर विभाग अध्यक्ष पदी पूनम संतोष सरोदे; कै. संतोष सरोदे कुटुंबीयांना धान्य व बँकेतूनही मदतीचा हात..
पुणे:-रुग्ण हक्क परिषदेचे शिवाजी नगर विभाग अध्यक्ष संतोष सरोदे यांचे गेल्या महिन्यात आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एक उत्कृष्ट कार्यकर्ता रुग्ण हक्क परिषदेने गमावला, मात्र संतोष सरोदे यांच्या पाश्चात्त त्यांच्या पत्नी पूनम सरोदे यांनी त्यांचे कार्य खांद्यावर घेतले आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या उपस्थितित पूनम सरोदे यांना शिवाजीनगर विभाग अध्यक्ष पदी नियुक्तीपत्र देण्यात आले. पूणे जिल्हा कार्याध्यक्ष अपर्णा साठे यांनी त्यांच्या पदाची शिफारस अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत चव्हाण यांनी पूनम सरोदे यांची विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती केली.
संतोष सरोदे यांच्या पश्चात त्यांची वृद्ध आई आणि पत्नी पूनम असा परिवार आहे. त्यांना पुढील तीन वर्षासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या धान्य बँकेतून दरमहा मोफत अन्नधान्य देण्याचे सभासद कार्ड सुध्दा पूनम सरोदे यांना दिले.
कार्यकर्त्यांच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करणारे, पाठ फिरवणारे नेते पदाधिकारी यांच्या समोर रुग्ण हक्क परिषदेने उत्तम आदर्श घालून दिला आहे. तसेच पूनम सरोदे यांची पदनियुक्ती करून त्यांचा सन्मान उमेश चव्हाण यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment