केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस संपन्न*-देशातील विविध राज्यातून होती उपस्थिती- - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, December 12, 2020

केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस संपन्न*-देशातील विविध राज्यातून होती उपस्थिती-

*केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस संपन्न*
-देशातील विविध राज्यातून होती उपस्थिती-
 
नागपूर:-केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्लीच्या वतीने दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस १०  डिसेंबर रोजी नागपूर येथे राष्ट्रीय संमेलन घेऊन आयोजित करण्यात येते राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या अध्यक्षतेखाली हे राष्ट्रीय संमेलन नुकतेच नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवा आश्रमामध्ये मोठ्या दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाले याप्रसंगी येथील कलाकारांनी देशभक्तीच्या गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले यावेळी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्याचप्रमाणे केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे टी.व्ही. चॅनलचे सुद्धा प्रसंगी उद्घाटन करण्यात आले तसेच यावेळी देशातील विविध मान्यवरांना समाज गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले प्रसंगी पुणे येथिल छायाताई ख़ैरनार यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले व  राष्ट्रीय संघटन सचिव शिवचरण उज्जैनकर व राऊत मैडम व मान्यवरांच्या हस्ते समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले याप्रसंगी त्यांचे बुके, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
       याच वेळी नागपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये १०८  रुग्णांना संपूर्ण भोजन थाळी चे वाटप करण्यात आले.
     याप्रसंगी महाराष्ट्रासह, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान अशा विविध राज्यातील केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी वाहतूक पर्यवेक्षक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, नागपूरचे  अरुण जमदाडे, एस. एस. कुमरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पेठ पोलीस स्टेशन नागपूरचे मदन मैराल, माजी महासंचालक स्टेट बँक ऑफ इंडिया नागपूरचे राम कृष्ण छांगाणी ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल, नागपूर,अजय पात्रे राष्ट्रीय प्रबोधनकार, नागपुर , पुणे येथील दत्ता कंद पाटील,, डॉ.अनिस जैन, राष्ट्रीय प्रचार सचिव केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली, संजय थोपटे तथा लातूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अनिल कोकणे, रमेशभाऊ पोतदार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment