उपमुख्यमंत्री अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या वृक्षांची तोड ,ग्रामपंचायत सदस्याला जिवे मारण्याची धमकी..
सोमेश्वर:-राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत वाघळवाडीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी वृक्षारोपण केले आहे. 150 झाडांचे वृक्षारोपण जुलै 2019 मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी , ग्रामपंचायत चे पदाधिकारी , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वृक्षारोपणचा कार्यक्रम पार पडला होता. यानंतर गेली दीड वर्ष ग्रामपंचायत’च्या माध्यमातून ठिबक व पाईप लाईन करून दररोज झाडांची काळजीपूर्वक निगा राखून झाडे वाढविण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामसेवक यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतच्या वतीने प्रतिनिधी या नात्याने हेमंत गायकवाड लक्ष देऊन झाडे जगवत आहेत.परंतु दि. 11 जानेवारी 2021 रोजी दुपारी अनंत सकुंडे आणि त्यांचे साथीदारांनी ग्रामपंचायत ने खर्च करून लावलेल्या आणि 15 ते 20 फूट वाढ झालेल्या जवळपास 20 ते 25 झाडांची तोड करून शासकीय कामाचे नुकसान केले आहे. ग्रामपंचायतने आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन करण्याची खात्री कार्यक्रमावेळी दिली होती. त्यानुसार झाडे जगवण्यात येत आहेत. परंतु अनंत सकुंडे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने झाडे तोडून आदरणीय अजितदादा पवार यांच्या आवडीचा उपक्रम असलेल्या झाडांच्या बाबत झाडांची तोड करून धक्का लावला आहे. झाडे सुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तच लावण्यात आली होती त्याच्या वर्तमानपत्रात बातम्या सुद्धा पसिद्ध झालेल्या होत्या. अजून जवळपास 125 झाडे जिवंत आहे. तसेच झाडे तोडू नका असे हेमंत गायकवाड यांनी त्यांना त्या घटना स्थळी जाऊन अडवले असता या ठिकाणी पाऊल ठेवायचे नाही, ही जागा आमच्या मालकीची आहे, तारेच्या कम्पाउंड च्या आत मध्ये आल्यास हात पाय तोडण्यात येईल. या ठिकाणी कोणीच फ़िरकायचे नाही, मी वकील आहे मला कोणाची भीती नाही असे म्हणत हेमंत गायकवाड यांना समक्ष बोलून जीवे मारण्याची धमकी दिली.
माझ्या जीवास धोका असून ग्रामपंचायतने केलेल्या वृक्षारोपणाचे पण नुकसान केल्याने योग्य ती कार्यवाही करून आपण न्याय द्यावा.आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांना जगविण्यासाठी आम्हाला संरक्षण दयावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड यांनी प्रांतअधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांच्या कडे केली असल्याचे लेखी पत्र दिले.
No comments:
Post a Comment