बारामती तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 16, 2021

बारामती तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

बारामती तालुक्यात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 
बारामती 16: बारामती तालुक्यात आज महिला रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ अनुक्रमे उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे आणि गट विकास अधिकारी राहुल काळभोर यांच्या हस्ते  करण्यात आला. बारामती महिला रूग्णालय येथे लसीकरण मोहिमेचा पहिला लाभार्थी अभिजित पवार यांना लस देवून मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

या वेळी नगरपरिषद मुख्याधिकारी  किरणराज यादव, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, वैद्यकीय अधीक्षक महिला हॉस्पिटल व सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे,  वैद्यकीय अधिकारी डॉ. बापू भोई, वैद्यकीय अधिकारी डॉ. केदारे, वैद्यकीय अधिकारी शासकीय महाविद्यालय, डॉ. जाधवर, प्रशासकीय अधिकारी  शासकीय महाविद्यालय, नंदकुमार कोकरे, उप अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. यशवंत कुलकर्णी, प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवीचे आरोग्य अधिकारी डॉ.जर्नादन सुरटे, डॉ.मेघा, डॉ.दडस तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. सदानंद काळे   यांनी लस देण्याबाबतच्या कार्यपद्धतीची पूर्ण माहिती दिली. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच  लस तीन टप्प्यात देण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, कोविन पोर्टलवर नोंदणी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात पोलीस विभागातील कर्मचारी , तिसऱ्या टप्प्यात कोमोबीर्ड रुग्ण  व  60 वर्षा वरील व्यक्तीस देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी डॉ.मनोज खोमणे म्हणाले की, पहिल्या सत्रात शंभर लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरण मोहीम जरी चालू झाली असली तरी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment