माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरितशपथ कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 4, 2021

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरितशपथ कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद..

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत हरित
शपथ कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद..

 बारामती दि.5 :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण - 2021 कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाव्दारे संपूर्ण राज्यात माझी वसुंधरा अभियानाची सुरूवात 02 ऑक्टोबर 2020 पासून करण्यात आली आहे. या अभियानामध्ये बारामती नगरपरिषदने देखील सहभाग घेतला आहे. यामध्ये  पृथ्वी , जल, वायू , अग्नी आणि आकाश या पंचतत्वावर आधारित कामगिरीवर शहराचे मूल्यांकन होणार आहे.

पर्यावरण विभागाच्या सूचनेनुसार शहरातील नागरिकांच्या वर्तनात बदल घडवून आणण्याकरीता आणि वसुंधरेच्य प्रती आपली जबाबदारी म्हणून शहरातील प्रत्येक नागरिकाने या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवावा म्हणून 01 जानेवारी 2021 रोजी शहरामध्ये विविध ठिकाणी हरित शपथेचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत नगरपालिका कार्यालयामध्ये सकाळी 11 वाजता मा. नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व कर्मचाऱ्यांना हरित शपथ देण्यात आली . तसेच सराफ होंडा शोरूम पाठीमागे नगराध्यक्षा तावरे यांचे हस्ते वृक्षारोपण करून हरित शपथ घेण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील , सचिन सातव , बाळासाहेब जाधव , दिपक मलगुंडे , सहायक पोलीस निरिक्षक वाघमारे, विविध बँकाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यानंतर नगरपालिकेचे अधिकारी यांनी शहरातील बँका , शाळा , कंपन्या अशा विविध ठिकाणी जाऊन या अभियानाविषयी जनजागृती करून उपस्थितांना हरित शपथ देण्यात आली. या सर्व ठिकाणी जवळपास 800 नागरिक व विद्यार्थ्यांनी हरितशपथ घेतली.

कॅनरा बँक , एक्सिस बँक , बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ महाराष्ट्र , स्टेट बँक ऑफ इंडिया , एचडीएफसी बँक , छत्रपती शाहू हायस्कूल , एकता इंग्लिश मिडीयम स्कूल , मएसो गजानन देशपांडे हायस्कूल , बानपाच्या सर्व 1 ते 8 नंबर शाळा , जळोची जिल्हा परिषद शाळा ,शारदाबाई पवार विद्या मंदीर शारदानगर  आदींनी मोठ्या उत्साहात या अभियानात आपला सहभाग नोंदविला. यापैकी बऱ्याच शाळांनी ऑनलाईन हरितशपथेचे देखील आयोजन केले होते.

याप्रसंगी विजय शितोळे , अक्षय नाईक , सुभाष नारखेडे ,विजय सुर्यवंशी , स्नेहल घाटगे , प्राजक्ता शिंगाडे  आदी नगरपालिकेचा अधिकारी वर्ग , सर्व आरोग्य , स्वच्छता व उद्यान  इत्यादी विभागातील कर्मचारी यांचा सहभाग व सहकार्य लाभले. त्याचप्रकारे नगरपरिषदेव्दारे केबल टिव्ही मार्फत शहरात 11 वाजता शहरातील सर्व नागरिकांसाठी हरितशपथेचे आयोजन देखील करण्यात आले होते. यासर्व कार्यक्रमानंतर नगराध्यक्षा पोर्णिमा तावरे यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी म्हणून पर्यावरण रक्षक म्हणून काम करण्याचे आवाहन करून या अभियानामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविल्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार मानले.
हरितशपथ घेताना बारामतीच्या माननीय नगराध्यक्षा सौ.पोर्णिमाताई तावरे ,नगरसेवक व शहरातील नागरीक

No comments:

Post a Comment