प्रशासकीय कार्यालयातच का होतात चोरी?महत्त्वाचे नोंदी असणारे दहा संगणक गायब.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, January 30, 2021

प्रशासकीय कार्यालयातच का होतात चोरी?महत्त्वाचे नोंदी असणारे दहा संगणक गायब..

प्रशासकीय कार्यालयातच का होतात चोरी?महत्त्वाचे नोंदी असणारे दहा संगणक गायब..
                                          फलटण(प्रतिनिधी):-प्रशासकीय कार्यालयात सद्या चोरीचे प्रमाण वाढलेले दिसते, म्हणून सहज आणि सोपी चोरीचे प्रकार पहावयास मिळत आहे,मागील वर्षांपूर्वी बारामती नगरपरिषद मध्ये लाखो रुपयांची चोरी झाली होती, अद्याप अजून चोर सापडला नाही, नव्हे तसा प्रयत्न अजूनही होताना दिसत नसल्याचे नागरिक बोलताना दिसते, तर याच नगरपरिषद मध्ये अजूनही काही मंडळी विनाकारण अधिकारी नसताना लुडबुड करीत असतात अश्या जर काही महत्वाच्या फायली गायब झाला अथवा ऐवज गायब झाला तर आश्चर्य समजू नका अशी अनेक नागरिक बोलताना भावना व्यक्त करीत आहे, त्यामुळे कार्यालयीन हलगर्जीपणाही तेवढाच कारणीभूत असल्याचे दिसते, नुकताच फलटण तहसीलदार कार्यालयातील संगणक अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेले आहेत यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे तहसील कार्यालय हे अधिकार गृहांमध्ये आहे या अधिकार गृहा मध्ये सर्व शासकीय कार्यालये आहेत तहसील कार्यालयात मध्यरात्री कोणी नसल्याचा फायदा उचलीत अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील महत्त्वाच्या नोंदी असलेले दहा संगणक चोरून नेले आहेत सकाळी हा प्रकार उघडकीस आला घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले आहे तहसील कार्यालय मधील महत्त्वाचे दस्तावेज संगणकात असून चोरट्याने त्यावरच डल्ला मारल्याने प्रचंड खळबळ माजली आहे पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

No comments:

Post a Comment