महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटक (पुणे शहर) पदी संजय प्रल्हाद जाधव यांची निवड .... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 21, 2021

महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटक (पुणे शहर) पदी संजय प्रल्हाद जाधव यांची निवड ....

महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटक (पुणे शहर)  पदी संजय प्रल्हाद जाधव यांची निवड ....
                                                           पुणे:-महाराष्ट्र रिक्षा पंचायतीने संजय जाधव यांना नियुक्तीपत्र देताना आनंद व्यक्त केला आहे. तळागाळशतील सर्व सामान्य माणसाला एकत्र करून त्यांच्या न्याय, हक्क व अधिकारासाठी आपण काम करीत आहोत कष्टक्यांना सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त झाला पाहिजे. श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. यासाठी पुढील काळात आपल्याला व्यापक लढा उभा करावा लागणार आहे.या देशाचा विकास होत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकासाची प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे, या विकासामध्ये आमचाही वाटा असला पाहिजे. अशी समाज व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे,या कामात आपल्या सर्वाचे सहकार्य अपेक्षित आहे. असे म्हणण्यापेक्षा तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय है काम पुढे जाऊ शकत नाही. आपण आत्तापर्यंत विविघ घटकांमध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम करीत आहात. घरकाम महिला सभा वतिने विविध उपक्रमांमध्ये देखील आपण सक्रीय सहभागी आहात. आपण कष्टकरन्यांसाठी समाजातील विविध घटकांसाठी, दिलेल्या योगदानाची दखल घेऊन आपली महाराष्ट्र रिक्षा पंचायत संघटक (पुणे शहर) या पदाची जबाबदारी देण्यात येत आहे. पुढील १ वर्षासाठी आपणांस ही जबाबदारी देण्यात आली असून या काळात आपल्याला दिलेल्या जबाबदारीचे योग्य रित्या नियोजन करुन कष्टकरी महिला, पुरुष यांचे संघटन करणेत्यांच्या मागण्या व प्रश्न सोडविणे, स्यानिक पातळीवर त्यांच्या विविध प्रश्न न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने लढा देणे. संघर्ष करणे मासिक बैठका घेणे, स्त्री व पुरुषांचे बचत गट स्यापन करणे, तसेच संघटनेच्या बैठकांना नियमित उपस्थित राहणे अशा प्रकारे काम आपण पूढील काळात करावे. व नियुक्तीबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले, यावेळी हे नियुक्ती पत्र श्री.बाबा कांबळे संस्थापक अध्यक्ष यांनी दिले.

No comments:

Post a Comment