*बारामतीतील खवैय्यांसाठी " फ्रेश फूड मार्ट " सज्ज*
बारामती:-चोखंदळ बारामतीकरांना त्यांच्या पसंतीचे खाद्यपदार्थ पुरविण्याबरोबरच व्यक्तीच्या शारीरिक तंदुरुस्तीला पूरक असणाऱ्या सर्वच बाबींचा विचार करून निर्माण केलेल्या " फ्रेश फूड मार्ट " चे उदघाटन बारामती हाय-टेक् टेक्सटाईल पार्कच्या संस्थापक अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उदघाटन साध्या पद्धतीने करण्यात आले. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती किती महत्वाची आहे याचा धडा कोरोनाने जगाला दिलेला आहे त्यामुळे चटकदार पदार्थांसोबतच ड्रायफ्रूटस् चे सर्व प्रकार सर्वच रेंजमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.तसेच सर्व प्रकारची अप्रतिम चवीची ड्राईड फळे हेही या शॉपचे वेगळे वैशिष्ट्य आहे.तसेच व्यायाम करणाऱ्या युवा- युवतींसाठी पिनट बटर, क्रॅन बेरी, ब्लू बेरी, ब्राऊन ब्रेड, डायजेस्टिव्ह कुकीज, पनीर याही गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
याशिवाय या शॉपमध्ये केक बनविण्यासाठी लागणारे संपूर्ण साहित्य, खाऊचे जवळपास सर्वच प्रसिद्ध ब्रॅण्डस् उपलब्ध आहेत.ज्या ब्रॅण्डचा खाऊ बारामतीत मिळत नाही ते सर्व ब्रॅण्ड नजीकच्या काळात येथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे या शॉपचे डायरेक्टर श्री ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.तसेच उपवासाचे पदार्थ, बेकरी पदार्थ, डेअरी पदार्थ,चटकदार पदार्थ, सर्व प्रकारच्या चटण्या, सॉसेस,चॉकलेट्स येथे उपलब्ध आहेत.
लवकरच "होम डिलिव्हरी " सुरू करणार असल्याचेही श्री. ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.
या उदघाटन समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचे स्वागत फ्रेश फूड मार्टच्या डायरेक्टर सौ. पल्लवी जगताप व श्री. ज्ञानेश्वर जगताप यांनी केले. याप्रसंगी उदघाटक सौ. सुनेत्रावहिनी पवार, नगराध्यक्षा सौ. पौर्णिमाताई तावरे यांच्यासह आलेल्या सर्वच मान्यवरांनी प्रत्यक्ष खरेदी करून या फ्रेश फूड मार्टला शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment