बारामतीतून पोलिसांनी काढला रूट मार्च - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

बारामतीतून पोलिसांनी काढला रूट मार्च

बारामती:-  बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये  मळद व पिंपळी व बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सांगवी,शिरवली, खांडज, निरावागज, मेखळी, सोनगाव,झारगडवाडी, घाडगेवाडी गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुक 2021 चे अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च मध्ये महत्त्वाच्या चौकांमध्ये महत्त्वाच्या गावांमध्ये सरकारी वाहनातील पी एस सिस्टिम वरून आचारसंहिते बाबत तसेच 37 (1)(3)  व माननीय जिल्हाधिकारी सो यांच्याकडील 144 आदेशाबाबत माहिती देऊन सदर ग्रामपंचायत निवडणूक शांततेत निर्भयपणे पार बांधण्याबाबत सूचना देण्यात आल्या. सदर रूट मार्च करिता बारामती शहर पोलीस स्टेशन ,बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच बारामती आर सी पी पथक आणि बारामती वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment