बारामती शहर पोलीस स्टेशन यांचेकडुन गावठी रिव्हाल्व्हर जवळ बाळगणारा आरोपी जेरबंद
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत सहा.पोलीस निरीक्षक श्री प्रकाश वाघमारे,व गुन्हे शोध पथकाचा स्टाफ पो.ना.रूपेश साळुके.पो.कॉ.सुहास लाटणे दशरथ इंगोले, योगेश कुलकर्णी,तुषार चव्हाण अकबर शेख.मा.पोलीस अधिक्षक सो.पुणे ग्रामीण यांचे शस्त्र बाळगणारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेक करणेबाबतचे दिलेल्या सुचने प्रमाणे बारामती शहर हददीतील ग्रामपंचायत इलेक्शनचे व वाढते गुन्हयाच्या अनुषंगाने खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना बारामती हॉस्पिटलचे मागे ०१:४५ वा.चे.सुमारास रेकॉर्ड वरील गुन्हेगार प्रतिक भालचंद्र शिंदे वय २५ वर्षे रा. हरीकृपानगर इंदापुररोड ता.बारामती जि.पुणे यावर यापुर्वी ३१६/२०२० भारतीय हत्यार
कायदा कलम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल असलेला व त्याचेकडुन पुर्वी दोन पिस्टल जप्त करण्यात आलेला गुन्हेगार संशयीत रित्या फिरत असताना मिळुन आला त्यास आम्ही इकडे कोणत्या कामासाठी आला असे विचारले असता त्याने उडवा उडविची उत्तरे देवुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यास शिताफीने पकडुन
त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला २५,०००/-रूपये किंमतीचे एक गावटी बनावटीचे काळे रंगाचे लोखंडी रिव्हाल्व्हर मिळुन आले दोन पंचासमक्ष मुददेमाल ताब्यात घेतला आहे.रिव्हाल्व्हर चे संदर्भाने सखोल चौकशी सुरू आहे.सदरची कामगिरी मा.पोलिस अधिक्षक श्री. अभिनव देशमुख सो.व मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते साो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर साो,मा.पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक
श्री प्रकाश वाघमारे, सहा.पो.उपनिरीक्षक संजय जगदाळे, संदिपान माळी, पो.हवा. अनिल सातपुते, गोपळ ऑंबासे पोलीस नाईक रूपेश साळुखे,दादासाहेब डोईफोडे,पो.कॉ.सुहास लाटणे, अंकुश दळवी,दशरथ इंगवले,बंडु कोठे,योगेश कुलकर्णी,अजित राऊत, तुषार चव्हाण,अकबर शेख, यांनी केली.
No comments:
Post a Comment