बारामतीत सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, January 3, 2021

बारामतीत सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी

*बारामतीत सावित्रीमाई फुलेंची जयंती उत्साहात साजरी*

बारामती दि.३: आज बारामती येथील शेरसुहास मित्र मंडळाच्या वतीने भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका,क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती बारामती शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात अली.या वेळी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेत उपस्थितांना पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले.यावेळी अनेक तरुणींनी आणि मान्यवरांनी सवित्रीमाईंचा धगधगता आणि संघर्षमय प्रवास सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला.तर सावित्रीमाईंचा पोशाख परिधान केलेल्या नालंदा अहिवळे या चिमुकलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तसेच या वेळी बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण,बामसेफचे आनंद थोरात,प्रा. डी.व्ही.सरोदे यांच्यासह सेजल अहिवळे, सौरवी अहिवळे, भावना अहिवळे या तरुणींनी देखील मनोगत व्यक्त केले.तर शुभम अहिवळे यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

दरम्यान या प्रसंगी बारामतीचे माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे,सुशिल अहिवळे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.प.सवाणे,रामभाऊ लोंढे,अनिल मोरे,नितीन गव्हाळे,सचिन जगताप,प्रशांत लांडे,सोमनाथ कदम,रामभाऊ मोरे,रितेश गायकवाड,राजेंद्र पवार,सुनिल चव्हाण,गणेश सावंत,बबलू भोसले,विजय लोंढे यांच्यासह सारिका गव्हाळे, पूजा लोंढे,राजश्री अहिवळे,प्रेरणा अहिवळे व आदी जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment