मुंबई:-गेली दोन दिवस चाललेल्या टकारी समाज संघ प्रदेश अध्यक्ष नामदेव जाधव यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्यातील टकारी समाजाचे पदाधिकारी , सदस्य ,समाज बांधव व महिला भगिनी यांनी उपोषणास भेट देऊन पाठिंबा दिला याची दखल घेत,आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी साहेब ,प्रधान सचिव आदिवासी विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य ,आयुक्त आदिवासी विभाग नाशिक ,आमदार बालाजी किणीकर अंबरनाथ विधान सभा, टकारी समाज संघ अध्यक्ष श्री नामदेव जाधव,पुणे पि.चि.अध्यक्ष रणजित गायकवाड,सरचिटणीस श्री विकास गायकवाड ,नितीन जाधव ,अंबरनाथ विभाग अध्यक्ष शशिकांत गायकवाड ,गणेश गायकवाड,चंद्रकांत
गायकवाड यांची मंत्री यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा झाली व मंत्री महोदय यांनी सचिव साहेबांना आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण पुणे यांना त्वरित या प्रकरणी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले व उपोषणकत्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली त्यानुसार समाजाच्या वतीने उपोषण सोडण्यात आले
No comments:
Post a Comment