बारामतीत दिलासादायक बातमी, कोरोना पॉझिटिव्ह आकडा कमी, तर कोवीशिल्डची लस पहा कुठे व कोणाला मिळणार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 15, 2021

बारामतीत दिलासादायक बातमी, कोरोना पॉझिटिव्ह आकडा कमी, तर कोवीशिल्डची लस पहा कुठे व कोणाला मिळणार..

बारामतीत दिलासादायक बातमी, कोरोना पॉझिटिव्ह आकडा कमी, तर कोवीशिल्डची लस पहा कुठे व कोणाला मिळणार..                                                                              बारामती:-कालचे शासकीय (15/01/21) एकूण rt-pcr नमुने  067.  एकूण पॉझिटिव्ह-06 . प्रतीक्षेत 00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -01. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -13 त्यापैकी पॉझिटिव्ह -02. कालचे एकूण एंटीजन 10. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-01.      काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   06+02+01=09.   शहर-06. ग्रामीण- 03. एकूण रूग्णसंख्या-6063           एकूण बरे झालेले रुग्ण- 5742 एकूण मृत्यू-- 141.असून ,
 आज शनिवार बारामतीमध्ये सकाळी 11 वाजता कोविड लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. महिला शासकीय रुग्णालय बारामती व प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खाजगी आरोग्य सेवेतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना सिरम इन्स्टिट्यूट ची कोवीशिल्ड ही लस देण्यात येणार आहे एका सत्रामध्ये 100 याप्रमाणे आज एकूण 200 लोकांना लस देण्यात येणार आहे  तसेच लाभार्थ्यांची निवड ही जिल्ह्यातून रॅन्डम पद्धतीने होणार आहे त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांना एसएमएस आलेला आहे अशाच लाभार्थ्यांना लस दिली जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment