दारूला फाटा देत नववर्षाचे स्वागत सलगर वस्ती पोलिसांची संकल्पना: सोलापूर टकारी समाज संघाचा पुढाकार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 1, 2021

दारूला फाटा देत नववर्षाचे स्वागत सलगर वस्ती पोलिसांची संकल्पना: सोलापूर टकारी समाज संघाचा पुढाकार

दारूला फाटा देत नववर्षाचे स्वागत सलगर वस्ती पोलिसांची संकल्पना: सोलापूर टकारी समाज संघाचा पुढाकार                                                        सोलापूर : दारू अन् मटणाला फाटा देत
टकारी समाज संघाच्या कार्यकर्त्यांनी सुगंधी दुधाचा आस्वाद घेत सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाचे अनोखे स्वागत केले. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या संकल्पनेतून हाउपक्रम राबवण्यात आला. थर्टी फर्स्ट म्हणजे दारू अन् मटणावर ताव मारणं हेजणू समीकरण बनले होते. त्यातून काही अनुचित प्रकार घडतात. वेळप्रसंगी वाद
निर्माण होऊन समाजातील शांतता भंग पावते. या गोष्टींना फाटा देत 
 ---------------------------------------------------------                                                              *दारु पिणे अन् नशेतच सरत्या वर्षाला निरोप अन् नव्या वर्षाचे स्वागत करण्याची जणू परंपराच बनली होती. सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत आणि इतर अधिकारयांनी एक संकल्पना मांडली.ती संकल्पना खूप आवडली. टकारी समाज संघाने पुढाकार घेऊन ती संकल्पना साकारली*.
-*सुनील जाधव,जिल्हाध्यक्ष-टकारी समाज संघ*
  ---------------------------------------------------------                                                        टकारी समाज संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव, शहराध्यक्ष अनिल शिवप्पा जाधव, युवक अध्यक्ष अनिल अशोक जाधव यांनी हा उपक्रम राबवून नव्या वर्षाच्या कार्याचा श्रीगणेशा केला.
यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, सपोनि वर्धन आणि फौजदार कवड़े यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अंबादास गायकवाड,
बालाजी जाधव, अशोक गायकवाड, बंटी गायकवाड, निशांत गायकवाड, सुरेश
जाधव, श्रीकांत जाधव, रामू जाधव,आनंद गायकवाड, शिवाजी जाधव, चंदू गायकवाड, गणेश जाधव, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment