बारामतीत दगड खाणीत पोहायला गेलेल्या दहा वर्षाच्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ... बारामती:-दुर्दैवी घटनेची धक्कादायक बातमी नुकतीच वाऱ्यासारखी पसरली, बारामती तालुक्यातील पिंपळी येथील दगड खाणीत पोहायला गेलेल्या दहा वर्षाच्या दोन मुलांचा
पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवा तानाजी शिंदे आणि सम्राट संतोष शिंदे अशी मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.मृत पावलेली दोन्ही मुले जवळ असलेल्या दगडखाणीत पोहायला गेली होती. लवकर परतली नाही तेव्हा शोधाशोध केली असता त्याचे मृतदेह पाण्यात आढळले. घटनेची माहिती मिळताच बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी स्टापसह घटना स्थळाला भेट दिली असून पुढील तपास बारामती शहर पोलीस करत असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment