रुग्ण हक्क परिषद नाशिक जिल्ह्याच्या अध्यक्ष सारिका नागरे सक्षम नेतृत्व करतील - उमेश चव्हाण
नाशिक :- स्त्रियांच्या सहभागाशिवाय कुठलीही संस्था, संघटना, समाज, देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. नाशिक जिल्ह्यातील रुग्ण हक्क परिषदेचा लढा - संघर्ष मर्यादित राहीला होता, काही काळानंतर सारिका नागरे यांच्याकडे जिल्हा अध्यक्ष पद सोपविले आणि संघटनात्मक कार्याला वेग प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे. येत्या १ फेब्रुवारी पासून "रुग्ण हक्क परिषद आपल्या दारी" आणि "रुग्ण हक्क परिषदेचे विक्रमी सभासद नोंदणी अभियान" नाशिक जिल्ह्यात राबविण्यासाठी उमेश चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या.
रुग्ण हक्क परिषद, नाशिक जिल्हा कमीटीतील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार आणि संवाद कार्यक्रमासाठी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण नाशिक येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी उमेश चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष सारिका नागरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरोदे केंद्रीय कार्यालय उपसचिव गिरीश घाग मंचावर उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील घराघरांत जाऊन लोकांची विचारपूस करा. लोकांचे प्रश्न जाणून घ्या. लोकांच्या सुख - दुखात सहभागी व्हा. रुग्णांना यथोचित मदत करा. सर्वांना रुग्ण हक्क परिषदेशी जोडुन घ्या, असे चव्हाण म्हणाले.
यावेळी योगेश सराफ, यशोदा पर्वतकर, सोमनाथ भोंडवे, जितेंद्र विंचू, योगेश कापडणीस आदि पदाधिकारी उपस्थितीत होते.
सारिका नागरे म्हणाल्या, पुढील काळात नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक ठीकाणी रुग्ण हक्क परिषदेच्या शाखा करु, संपूर्ण नाशिक शहरात सदस्य नोंदणी अभियान यशस्वी करुन इतर प्रश्न सोडवु.
No comments:
Post a Comment