महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती च्या वतीने पत्रकार दिन साजरा.. आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी व पत्रकार यांचा सन्मान.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, January 6, 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती च्या वतीने पत्रकार दिन साजरा.. आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी व पत्रकार यांचा सन्मान..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती च्या वतीने पत्रकार दिन साजरा.. आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी व पत्रकार यांचा सन्मान..                                                              बारामती:- 6 जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती यांच्या वतीने बारामती मधील कोरोनाचा काळात काम करणाऱ्या व तत्पर सेवा देणाऱ्या आरोग्य अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, पत्रकार बांधव, सामाजिक कार्य क्षेत्रातील मान्यवर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तहसीलदार विजय पाटील, डॉ मनोज खोमणे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ सदानंद काळे वेधकीय अधिकारी सिल्व्हर ज्युबिली, दैनिक पुढारी चे राजेंद्र गलांडे, दैनिक नवराष्ट्र चे अमोल तोरणे, tv9 चे नाविद पठाण,आज तक चे वसंत मोरे, दैनिक सकाळ चे मिलिंद संगई,दैनिक लोकमत चे प्रशांत ननवरे,अमोल यादव, दैनिक सामना चे अमोल निलाखे,दैनिक प्रभात चे प्रमोद ठोंबरे,साप्ताहिक नीरा बारामती वार्ता चे राजेश वाघ, रामभाऊ तावरे,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, नगराध्यक्ष पौर्णिमा ताई तावरे, जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, गटनेता सचिन सातव, आरोग्य अधिकारी सुभाष नारखेडे,राजेंद्र सोनवणे,जेष्ठ समाजसेवक ऍड श्यामसुंदर पोटरे,प्रशांतनाना सातव, माहिती अधिकारी रोहिदास  गावडे,आमित फडतरे यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला यावेळी सन्मान पत्र, श्रीफळ शाल देऊन गौरविण्यात आले तर काही जणांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सन्मान करण्यात आला ,यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात बोलताना पत्रकारिता कशी असावी व त्याचा वापर कसा करावा त्यामुळे न्याय कसा देता येईल यासाठी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बारामती तालुका अध्यक्ष संतोष जाधव, सचिव राजू कांबळे, अनिल पोटरे, फिरोज शेख, मन्सूर शेख, बापू शेंडगे, अजिंक्य सातकर,अभिजित कांबळे, संजय भिसे, लक्ष्मण भिसे,अझर शेख,सिकंदर शेख, सम्राट गायकवाड, दया दामोदरे, प्रवीण जाधव, अमीर पठाण, राजीव कांबळे सह पत्रकार बांधव यांनी या कार्यक्रम आयोजित केला होता तसेच उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांना काही कामानिमित्त बाहेर गावी जावे लागण्याने त्यांचा सन्मान आल्यानंतर करणार असल्याचे सांगितले,यावेळी उपस्थितीत्यांचे आभार अध्यक्ष संतोष जाधव यांनी मानले.

No comments:

Post a Comment