सावकारीपासून बाजूला रहा.यदाकदाचित जर कोणी त्याच्यामध्ये सापडला तर तडीपार करेन, मोक्का तरी लावेन..उपमुख्यमंत्री अजित पवार. बारामती:मागील काही महिन्यांपासून सावकारी करणाऱ्या वर चांगलीच कारवाई झाली होती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे कारवाईचा धडाका चालू केला होता तर काही जणांना जमिनी परत करण्यास सावकाराला भाग पाडायला लावले होते, तर अजून काही सावकार जमीन परत करणार असल्याने तात्पुरती कारवाई टळली असली तरी मात्र फसवणूक झाल्यास नक्की होणार असे समजते, याच वाढत्या सवकारीतून बारामती मध्ये वातावरण दुषित झाले असल्याचे सांगण्यात आले,उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले बारामतीतील सावकारीचे प्रकार मध्यंतरी माझ्या
कानावर आले. शहरात प्रितम शहा यांनी सावकारीतून
आत्महत्या केली. त्यांच्या फोनचे संभाषण ऐकायला
मिळाले. तुम्ही प्रत्येकाने सावकारीपासून बाजूला रहा.
यदाकदाचित जर कोणी त्याच्यामध्ये सापडला तर
त्यात एकतर तडीपार करेन, मोक्का तरी लावेन
किंवा कायद्याने त्याच्यावर कठोर कारवाई होईल.
नंतर तुम्ही माझ्याकडे येवून, दादा चुकून झालं..
चुकून झालं.. एवढ्या वेळेला माफ करा असे म्हणालं.
पण कोणी मायेचा लाल आला तरी माफ करणार
नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवा. कोणी किती मोठ्या
बापाचा असो किंवा छोट्या बापाचा, मला काही घेणं
नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील अवैध सावकारांना इशाराच यावेळी दिला.बारामती शहर, तालुक्यातल्या लोकांना जर कोणी दादागिरीने, मनगटशाहीच्या जोरावर लुटायला लागला, वाट्टेल तशा पद्धतीने कायदे व नियम धुडकवू लागला तर अधिकारयांना मी निक्षून सांगतोय, माझ्या जवळचा असला तरी अशा लोकांवर कारवाई करा,असा सज्जड इशाराही पवार यांनी दिला.
बारामतीत आयोजित कार्यक्रमात पवार यांनी अवैध
सावकारीबाबत प्रथमच जाहीरपणे आपली भूमिका मांडली.यावेळी
त्यांनी सावकारांना दिलेल्या इशार्यामुळे बारामतीत
अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पवार यांनी खास
आपल्या स्टाईलमध्ये सावकारांचा समाचार घेतला.
शिवाय बारामतीत असले उद्योग चालू देणार नाही,
अशी तंबी दिली.त्यामुळे सावकारी करणाऱ्याचे धाबे दणाणले असले तरी काही वेळा अश्या सावकारी करणाऱ्याला पाठीशी घालण्याचे काम केले जाते अशी चर्चा ऐकावयास येत आहे,कुणाची फसवून जमिनी बळकावल्या जातात तक्रार केली तर त्याची दखल घेत नसल्याचेही बोलले जाते, त्याच बरोबर ग्रामीण भागात देखील सावकारी व जमीन फसवणूक ची तक्रारी ची दखल घेणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले, अधिकारी वर्गानी पाठीशी घालू नये, कुणाच्या दबावाखाली न येता पीडितांना न्याय द्यावा ही अपेक्षा होताना दिसते.
No comments:
Post a Comment