अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांसाठी शासकीय जागा देण्यासाठी माळशिरस तहसील कार्यालयासमोर तीव्र निदर्शने
अतिक्रमणे नियमित होत नसतील तर तहसीलदारांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही....विकास धाइंजे
घरकुले बांधायला शासकीय जागा दिली नाही तर तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधणार.....वैभव गिते
सोलापूर:- सन 2020-21 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत "महा आवास अभियान ग्रामीण" राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,आवास योजना पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व इतर या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करनेसंदर्भात ज्या शासकीय,गावठाण, गायरान,शेती महामंडळ, व इतर जागेतील जागा व घरे नियमाकुल करण्याच्या संदर्भात तालुका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे पाऊल अथवा कार्यवाही केली नाही त्यामुळे शासन निर्णयांची व शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे अनेक जाती धर्मातील गोरगरीब घरकुल लाभार्थी हक्काच्या घरापासून व जागा व घरे नियमानूकुल होण्यापासून वंचित आहेत.
माळशिरस यासह सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक गावांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे 2011 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणाऱ्या लोकांच्या नोंदी नमुना नंबर आठ ला नोंदी घेतलेल्या नाहीत.ग्रामसेवकांनी आर्थिक तडजोडी करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व चुकीची दिशाभूल करणारा अहवाल ऑनलाईन पंचायत समितीस व तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयास पाठवला आहे.(उदा.नातेपुते,कुरबावी),नव्याने तालुक्यातील सर्व गावांचा फेरसर्वे करावा.सर्व नोंदी कायदेशीर घेण्यात याव्यात.कुणावरही अन्याय होणार नाही कोणीही या सर्व लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
मा.उपविभागीय अधिकारी (प्रांत) अकलूज यांनी दिनांक 20 मार्च 2020 रोजी तहसीलदार यांना शासकीय जागेतील अतिक्रमणे कायम करणेबाबत शासन निर्णय व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन कार्यवाही करावी असे पत्र पाठवले आहे तसेच दिनांक 14/9/2020 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी मा.उपविभागीय अधिकारी (प्रांत)अकलूज याना शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानूकुल करण्यासाठी पत्र पाठवले आहे.तरीसुद्धा माळशिरस तहसील,पंचायत समीती या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही.गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना अहवाल मागितला आहे परंतु आजअखेर ग्रामसेवकांचा अहवाल आलेला नाही कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवक व तलाठी यांच्यावर कार्यवाही करावी.सर्व संबंधित विभागांची व संघटनेच्या पदाधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी तरी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास VBयोजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास ग्रामीण राबवून सर्व शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानुकूल न केल्याने व घरकुल साठी शासकीय जागा न दिल्याने माळशिरस जि.सोलापूर या तहसील कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेच्या वतीने आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास दादा धाइंजे धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली यावेळी प्रास्तविक करताना विकास दादा धाइंजे यांनी सर्व शासननिर्णय शासनाचे धोरण पंचायत समिती व तहसीलदार यांनी आजपर्यंत केकेल्या कामकाजाचा चुकारपणाचा पाढा जनतेपुढे मांडला व एक महिन्यात सर्व अतिक्रमणे नियमित न केल्यास माळशिरस तहसील कार्यालयावर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले.नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांनी माळशिरस तालुक्यातील 108 गावांमध्ये अनेक जाती-धर्माच्या नागरिकांना घरकुले मंजूर आहेत परंतु त्यांच्याकडे जागा उपलब्ध नसल्याने घरकुले माघारी जात आहेत.शासनाने ज्यांना घरकुलांसाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासकीय गायरान गावठाण व इतर जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत तरीसुद्धा तालुका प्रशासन जाणून-बुजून लाभार्थ्यांना शासकीय जागा उपलब्ध करून देत नाही म्हणून प्रशासनाचा निषेध केला ताबडतोब घरकुलांसाठी जागा न दिल्यास माळशिरस तहसील कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर व पंचायत समितीच्या तिसऱ्या मजल्यावर घरकुले बांधण्याचा इशारा यावेळी वैभव गिते यांनी दिला.सामाजिक कार्यकर्ते विशाल साळवे यांनी नातेपुते पश्चिम भागातील सर्व अतिक्रमणे नियमित करावेत अशी मागणी केली. माळशिरस शहराचे माजी अध्यक्ष यांनी मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला डॉक्टर कुमार लोंढे यांनी तहसीलदार यांचा कडक शब्दात निषेध नोंदवला.उपस्थित जनसमुदायामधील प्रशासनाच्या प्रति रोष व निदर्शनाची तीव्रता लक्षात घेऊन माळशिरस तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार तुषार देशमुख यांनी जनसमुदायासमोर घेऊन तात्काळ संबंधित गटविकास अधिकारी पंचायत समिती,अधीक्षक भूमिअभिलेख, तहसील या विभागांची बैठक घेऊन हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले त्यानंतर आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते विकास दादा धाईंजे व जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले.यावेळी संजय झेंडे,बाबासाहेब सोनवणे,रणजित धाइंजे, रणजित सातपुते,दयानंद धाइंजे,संघर्ष सोरटे व आंबेडकरी चळवळीतील नेत्यांसह माळशिरस तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment