राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने कार्यकारी उपअभियंता पाटबंधारे विभाग बारामती यांना निवेदन.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, January 19, 2021

राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने कार्यकारी उपअभियंता पाटबंधारे विभाग बारामती यांना निवेदन..

बारामती:- बारामती मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष बारामती तालुका यांच्या वतीने कार्यकारी उपअभियंता पाटबंधारे विभाग बारामती मा.अश्विन पवार साहेब यांना निरा डावा कालवा या वरती चालु असलेल्या *अस्तारिकरणा* च्या कामा संदर्भात निवेदन देण्यात आले त्यावेळी राष्ट्रीय समाज पक्ष चे तालुका अध्यक्ष अँड.अमोल सातकर यांनी सांगीतले की बारामती मधुन जो ब्रिटिशकालीन कॅनॉल 125 वर्षापूर्वी   गेलेला आहे त्याचे आज डागडुजी आस्तारीकरणाचे काम चालु आहे त्यामुळे आजुबाजूला असणाऱ्या शेतकरी वर्गाचे फार मोठ्या प्रमाणावर  नुकसान होणार आहे तसेच बारामती शहर व आजुबाजुला  आसणारया बोअरवेल, विहीरींना होणारा पाझर बंद होणार आहे,त्यामुळे विहीरी बोअरवेल कोरड्या पडण्याची शक्यता  निर्माण झालेली आहे तसेच आजुबाजुला कॅनॉलच्या कडेला जी मोठ मोठी झाडे आहेत, ती देखील वाळून जाणार आहेत, पर्यायाने पर्यावरणाचा रहास होणार आहे आहे व प्रदुषण वाढण्यास मदत होणार आहे ,सबब आपण सदर कॅनाल मध्ये जे अस्तारीकरणाचे काम सुरू आहे त्या अस्तारीकरणामधे जागोजागी साधारणपणे 3 इंच होल ठेवावे,ज्यामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, झाडे जगतील पर्यावरणाचा रहास थांबेल व त्यामुळे शेतकरीवर्गाचे नुकसानही होणार नाही. असा एक पर्याय  सुचवला त्यावेळी उपअभियंता साहेब यांनी आपली मागणी योग्य आहे आमच्या वरिष्ठांशी बोलुन मार्ग काढुयात असे सांगितले यावेळे,पक्षाचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठलराव देवकाते,डाॅ नवनाथ मलगुंडे,किशोर सातकर, निखील दांगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते,

No comments:

Post a Comment