मूठभरच अक्कल असावी चंद्रकांत पाटील यांना - उमेश चव्हाण*
पुणे:- शेतकऱ्यांना मरणाच्या खाईत ढकलणारे अन्यायकारक कृषी कायदे मागे घ्यावेत, म्हणून देशभरातील शेतकरी उन, वारा, थंडी, पावसात लढत आहे. शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा कायदा देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणत आहे. अन्यायकारक कायद्याला देशभरातून विरोध करणाऱ्या करोडो शेतकऱ्यांना 'मूठभर' लोकांचे आंदोलन आहे, अशी वल्गना करण्याचे धाडस चंद्रकांत पाटील करतात. या चंद्रकांत पाटलांची अक्कल सुद्धा मूठभरच असेल, यात शंका नाही. असा घणाघाती टोला रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी लगावला.
दरवर्षी पक्ष बदलणाऱ्या नारायण राणेनी आयोजित शेतकरी कायदा समर्थन मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटलांनी मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणून शेतकऱ्यांचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. काहीही बेताल वक्तव्य करण्याच्या त्यांच्या सवयी आणि सातत्य बघता चंद्रकांत पाटील यांना मूर्खपणाचे डोहाळे लागले असावेत, असेही परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
या देशाचे संरक्षण आणि अर्थव्यवस्था शेतकऱ्यांच्या जीवावर टिकून आहे. त्याच शेतकऱ्यांवर टीका करताना भाजप नेत्यांनी लाज- शरम बाळगावी. रुग्ण हक्क परिषद शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत लढत राहिल.
No comments:
Post a Comment