बारामतीत भाजपा च्या वतीने निवेदन पत्र प्रसिद्ध तर पाटबंधारे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबपुष्प भेट... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, January 28, 2021

बारामतीत भाजपा च्या वतीने निवेदन पत्र प्रसिद्ध तर पाटबंधारे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबपुष्प भेट...

बारामतीत भाजपा च्या वतीने निवेदन पत्र प्रसिद्ध तर पाटबंधारे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने गुलाबपुष्प भेट...                                                                                                बारामती:-बारामतीमध्ये ब्रिटीश कालीन कॅनॉल आहे. गेल्या १९२७ सालापासून यारामतीकरांची तहान भागवत आहे. अनेक पिढ्यांनी त्याचा फायदा घेतला आहे. बारामतीमध्ये सुशोभीकरणाच्या नावाखाली अगदी यारामती शहराच्या मध्य भागातून जाणार्या
कॅनॉलला आतील बाजूने पाण्याचा पाझर १००% थांबावा म्हणून शेततळ्यामध्ये जो प्लॅस्टिक कागद वापरला जातो तो वापरण्यात येऊन त्यावर ५ इंच जाडीचे सिमेंट स्टिलचा स्लॅब टाकून बारामती शहरातील ६ किमी अंतरातील कॅनॉल चे सिमेंट काँक्रीटीकरण करणेत येत आहे. ते बारामती शहर वासीयांना दुष्काळी करणारे आहे. पुढील २५ वर्ष बारामतीमध्ये कॅनॉल नाही, अशीच परिस्थिती होणार आहे व कोणी विरोध करीत नाही म्हणून पुढे ग्रामीण भागात देखील असेच सिमेंट काँक्रीट करण केले तर तालुका १०० टक्के दुष्काळी होईल याचा पण बारामती तालुक्यातील तमाम नागरिकांनी विचार
करावा.बारामती शहराच्या परिसरात असणार्या शेकडो बोअर व विहीरी कोरड्या पडणार आहेत. प्राधीकरण व बारामती नगरपरिषद संपूर्ण बारामती वासीयांना पाणी पुरवू शकत नाही. गेली दोन वर्ष बारामती नगरपरिषदेमध्ये नवीन पाणी पुरवठा कनेक्शन देणे बंद केले आहे. बारामती नगरपरिषदेमध्ये हजारो पाणी कनेक्शन मागणी अर्ज पडून आहेत.जरी पाणी मिळालं तरी ते परवडणार नाही व ते मीटर कनेक्शनने घ्यावे लागणार आहे. कॅनॉलला बाहेर च्या बाजूने सुशोभिकरण करण्यास बारामती नागरिकांची अजिबात हरकत नाही, उलट सुशोभिकरणासाठी बारामतीकरांचा
पाठींबाच आहे असे असताना मा.उपमुख्यमंत्री  कॅनॉलला आतील बाजूस काँक्रीटीकरण करणेचा का हट्ट करीत आहेत? हे समजत नाही. गेली ५० वर्ष जिरायत भाग पाण्या करीता टाहो फोडत असताना त्यांना तर पाणी दिलेच नाही.उलट बारामती शहरामध्ये जे फुकट पाणी मिळत आहे ते बंद करण्याच हट्टहास का करत आहात. तुम्हाला भर भरून मत देणार्या नागरिकांच्या तोंडातुन का काढून घेत आहात. कोणता बदला आपण बारामतीकरांचा घेत आहात. कदाचित
तुम्हाला १०/२० हजार मत नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही. याची खात्री असल्यामुळे आपण जन भावनेचा आदर न करता हा तुघलकी निर्णय घेत आहात. आपल्या या निर्णयामुळे कदाचित आपली शेती सुधारेल हा तुमचा वैयक्तीक फायदा होईल. पण बारामतीकर होरपळून निघाल्या शिवाय राहणार नाही.उन्हाळ्यामध्ये कॅनॉल चे आवर्तन महिनाभर सुटण्यास वेळ झाला तरी पाण्याची टंचाई निर्माण होते आणि मा.अजितदादा(उपमुख्यमंत्री) आज तर तुम्ही तुमच्या हट्टापोटी कॅनॉल पाझर कायम स्वरूपी बंद करीत आहात.अर्ज विनंत्या करून प्रत्यक्ष भेटून आपण हा निरा डावा कॅनॉल सिमेंट काँक्रीटकरणाचा निर्णय थांबवण्याची सदबुद्धी देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करणारे पत्र यावेळी भारतीय जनता पार्टी च्या वतीने करण्यात आले तर नुकताच आज बारामती भाजपा तर्फे पाटबंधारे उपविभाग बारामती येथे अश्विनजी पवार यांना मागणी संदर्भात पत्रक व गुलाबपुष्प दिले.यावेळी अविनाश मोटे,सतीश फाळके,गोविंद देवकाते,अक्षय गायकवाड,रणजीत गटकळ,सुधाकर पांढरे,संदीप अभंग,संजय रायसोनी, सुरेंद्र जेवरे,प्रमोद डिबंळे,अभिलाष पोटे,स्वप्निल शिंदे,बापुराव फणसे,रघु चौधर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment