इंदापूर तालुक्यातील रेडणीच्या महिलेने धरली थेट राज्यमंत्री भरणे यांची कॉलर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, January 11, 2021

इंदापूर तालुक्यातील रेडणीच्या महिलेने धरली थेट राज्यमंत्री भरणे यांची कॉलर

इंदापूर तालुक्यातील रेडणीच्या महिलेने धरली थेट राज्यमंत्री भरणे यांची कॉलर
                                            इंदापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील रेडणी गावचा वादाचे पडसाद थेट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत गेल्याचे दिसले. विशेष म्हणजे या प्रकरणात महिलेने थेट मंत्री दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडली असल्याचं समोर व्हायरल व्हिडीओ द्वारे आलं आहे. दीड महिन्यांपूर्वी संभाजी चव्हाण यांच्याविरुद्ध प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे 394 अंतर्गत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर संभाजी चव्हाणने प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगेवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला.म्हणून काल प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे कुटुंबातील महिला वर्ग मुला बाळासाहित दत्तात्रय भरणे यांच्या घराबाहेर उपोषणाला बसले होते.
प्रफुल्ल चव्हाण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. प्रफुल्ल चव्हाण
हा दत्तात्रय भरणे यांचा निकटवर्तीय आहे.
प्रफुल्ल चव्हाण आणि सचिन तरंगे यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी 5 लाख रुपये खंडणी मागितली होती. ती न दिल्याने गुन्हा दाखल केल्याचा आरोप प्रफुल्लची आई शोभा
चव्हाण यांनी केलाय. शोभा चव्हाण या रेडणी गावच्या माजी सरपंच आहेत. इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी प्रफुल्लची आई शोभा चव्हाण या राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर आमरण उपोषणाला बसल्या होत्या. त्यावेळी यांनी थेट दत्तात्रय भरणे यांची कॉलर पकडत जाब मगितल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. काल दुपारीच हे उपोषण मागे घेतलं असलं तरी प्रकरणाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून असा प्रकार घडला नसल्याचे व ते कुटुंब आमच्या घरातील असल्यासारखे आहे तरी हा विषय थांबला असल्याचे समजते.

No comments:

Post a Comment