अमित बगाडे यांना आदर्श पत्रकार व राज्यस्तरीय युवा संघर्ष पुरस्कार प्रदान - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, January 29, 2021

अमित बगाडे यांना आदर्श पत्रकार व राज्यस्तरीय युवा संघर्ष पुरस्कार प्रदान

अमित बगाडे यांना आदर्श पत्रकार व राज्यस्तरीय युवा संघर्ष पुरस्कार प्रदान
                                                           चांदवड (प्रतिनिधी) दि.२९ "दलीत आदीवाशी समाजातील युवती  युवकांसह जेष्ठाच्या सर्वागीण विकासात्मक कार्यासाठी सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध पध्दतीने कार्यरत राहुन समाजसेवा करावी असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे  प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांनी केले. दलीत आदीवाशी क्रांती दलाच्या वतिने सांस्कृतिक स्पर्धा व कोविड योध्दा युवा संघर्ष पुरस्कार वितरण कार्यक्रम चांदवड मातोश्री लाॅन्स या ठीकाणी घेण्यात आला या प्रसंगी रविंद्रदादा जाधव बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टायगर ग्रुपचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब जाधव, रिपाई नेते कैलास केदारे, रिपाई चांदवड तालुकाध्यक्ष महावीर, समितीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव वाघ, जिल्हा संघटक प्रदीप पगारे, रिपाई नेते अनिल केदारे, समितीच्या चांदवड तालुकाध्यक्षा मा.परविन बागवान आदी. मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या सर्व मान्यवरांचा सत्कार दलित आदीवाशी क्रांतीदलाचे अध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांनी शाल गुलाबगुच्छ देवुन केला. या वेळेस युवा संघर्ष पुरस्काराने अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे पुणे जिल्हा सहचिटणिस तसेच बारामती लाईव्ह चे संपादक मा.अमित बगाडे यांना आदर्श पत्रकार व राज्यस्तरीय युवा संघर्ष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तसेच   इतर पद अधिकारी यांना देखील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले निफाड तालुकाध्यक्ष मा.शिलाताई जाधव, दिंडोरी तालुकाध्यक्षा पठाण, पत्रकार मा. सागरजी निकाळे, मा. प्रिया सुरटे, मा. उमा दिंडे, मा.कल्पना जगताप,  मा.निर्मला गायकवाड, मा.मंगला बच्छाव, मा. रेखा मंजुळकर, यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास वर्षा आहीरे, वैशाली पगारे, सुनिल नागमोती, आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळेस ग्रुप डांस, समूहनृत्य स्पर्धा संपन्न झाला. शेवटी आभार होवुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment