*नगरसेविका मयुरी सुरज शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आमराई भागातील रस्त्यांची कामे लागली मार्गी*
बारामती:- बारामती नगरपरिषद मधील प्रभाग क्र १७ आमराई भागातील १.माता रमाईभवन व बी.एस.एन.एल ऑफिस समोरील रस्ता २.प्रबुध्दनगर कडून पोस्ट ऑफिस कडे जाणारा रस्ता यांचे डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमाताई तावरे,जेष्ठ नगरसेवक किरणदादा गुजर,उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद,गटनेते सचिन सातव, उपगटनेत्या सविताताई जाधव,बांधकाम सभापती संतोष जगताप,नगरसेविका अनिता जगताप, मा.नगरसेवक बाळासाहेब मागाडे,अभिजित चव्हाण, विजय खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी भानुदास बागाव, गजानन गायकवाड, सतिश खुडे,सिकंदर शेख, बाबा सावंत, रमेश गायकवाड, रोहन मागाडे, सुरज शिंदे, कैलास शिंदे, बबन भोसले, आकाश शिंदे, उमेश शिंदे इ मान्यवर उपस्थित होते.
बी.एस.एन.एल ऑफिस व पोस्ट ऑफिसकडे कामासाठी येणा-या लोकांना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येण्याजाण्यास त्रास होता,स्थानिक लोकांची सुध्दा या कामाची मागणी होती सदर बाब कार्यक्षम नगरसेविका मयुरी शिंदे यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास आणून कामाचा सातत्याने पाठपुरावा करून काम मार्गी लावले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकास कामास तसेच नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमी प्राधान्य दिले आहे असे सांगून मयुरी शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment