महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 27 रोजी राज्य अधिवेशन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 20, 2021

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 27 रोजी राज्य अधिवेशन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 27 रोजी राज्य अधिवेशन

मुंबई प्रतिनिधी :-   महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 16 वे राज्यस्तरीय अधिवेशन ठाणे येथे 27 फेब्रुवारी 2021 रोजी गडकरी नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे. याची माहिती राज्य कार्यकारणीच्या वतीनं देण्यात आली.

या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, नामदार एकनाथ शिंदे, नामदार जितेंद्र आव्हाड, नामदार धनंजय मुंडे, नामदार आदिती तटकरे, खा. श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून वर्षभरात पत्रकारांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत केली जाते. पत्रकारांच्या हक्काचे व्यासपीठ राज्य पत्रकार संघाने उपलब्ध करून दिले असून या अधिवेशनामध्ये विविध मागण्यांचे ठराव  पास करण्यात येणार आहेत. या अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्याचे अध्यक्ष वसंतराव मुंडे ,सचिव विश्वास आरोटे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वृत्तवाहिनीचे प्रदेशाध्यक्ष रणधीर कांबळे, ग्रामीण प्रदेशाध्यक्ष मनीष केत, राज्य संघटक संजय भोकरे, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र वाघमारे ,राकेश टोळे,प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ  देशकर, मुंबई अध्यक्ष संजय माळवदे, कोकण विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नितीन शिंदे, विदर्भ प्रमुख बाळासाहेब देशमुख, नागपूर विदर्भ प्रमुख महेश पानसे यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment