*महाराष्ट्रातील आदर्श जिल्हा परिषद सदस्या म्हणून कु.सक्षणा सिद्राम सलगर यांचे 4 वर्ष पूर्ण उल्लेखनिय कार्याबद्दल...*
सातारा(प्रतिनिधी):-ग्रामिण महाराष्ट्राच्या राजकीय क्षितीजावर नावलौकीक अशी कमी वयात जिल्हयाच्या अल्पावधीत आपल्या विकास कामाच्या माध्यमातून नवीन पॅटर्न तसेच नियोजनबध्द कार्य पध्दतीत आपल्या कार्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव जिल्हा परिषद सदस्या नाव पटकन समोर येते ते म्हणजे कु.सक्षणा सिद्राम सलगर हे नाव प्राधान्याने समोर येते.*
*लोकसेवेचा वसा व वारसा ज्यांनी जपला ते म्हणजे कु.सक्षणा ताई यांनी मतदार संघात,शिक्षण,आरोग्य,सहकार,कृषी,जलसंधारण,समाजकल्याण अर्थकारण,महिला व बालकल्याण,या क्षेञाती विकासाचे व्हिजन करून जनसामान्याचे अविरतपणे कार्य करण्याची तळमळ जनमाणसात सदैव जाऊन समस्या सोडवने,मार्गदर्शन करणे,न्यायप्रिय भूमिका देण्यासाठी सदैव जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करण्याचा ध्यास ज्यांनी जपला ते म्हणजे सक्षणा ताई सलगर होय..*
*"पाणी."*
"ग्रामिण पाणी पुरवठ्याच्या समस्या गावातील लोकांच्या जाणून घेऊन तात्काळ प्रशासनाला पाणि प्रश्न सोडविण्यास सांगितले."
तो आज घडीला पाण्याचा मतदार संघातील पाणी प्रश्न मार्गी लावला तसेच मतदार संघात आर.ओ.फिल्टर पाणी."
*"सिंचन"*
"जिल्हा परिषद मधून शेतकरी बांधवांना सूक्ष्म सिंचन ची तुषार सिंचन स्पिकलर वाटप सर्वाधिक जास्त वाटप."
*"सहकार"*
"मतदार संघातील विविध कार्यकारी सोसायटी ला भेट देऊन शेतकरी बांधवांना खते बियाणे,रेशनिंग मालाच्या समस्या जाणून त्यांच्या सर्व समस्या तहसीलदार तसेच पुरवठा अधिकारी यांना चर्चा करून सकारात्मकपणे मार्गी लावले"
*"महिला सक्षमीकरण"*
"मतदार संघात बचत गटाच्या महिलांना सर्वाधिक कर्ज वाटप करून त्यांच्या उदयोगाला प्राधान्य दिले.
महिला व मुलींना MS-CIT साठी त्यांनी महिला बालकल्याण समिती वर सदस्य असल्याने सर्वाधिक मदतीचा ओघ मतदार संघासाठी ठेवला व लाभ मिळवून दिला.
कराटे स्पर्धा प्रशिक्षण स्पर्धातून मुलींना प्रशिक्षण.
तसेच सायकल वाटपाचा ही लवकरच प्रारंभ होईल."
*"अर्थकारण"*
"मुलींच्या शिक्षणासाठी अनेक दिवसा पासून प्रलंबित असलेली शिष्यवृत्तिचा प्रश्न मार्गी लावला तसेच महिलांना उमेद च्या माध्यमातून अर्थिक बचत गटांना मदत."
*"शिक्षण."*
"जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व शाळा गळत होत्ये त्यासाठी दुरूस्ती तर नवीन इमारती मंजूर करून विद्यार्थी,विद्यार्थींना ज्ञानदानाच्या ज्ञानमंदिरात पावसाळयात होणारा ञास संपुष्टात आणला."
*"आरोग्य"*
"प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर माता भगिनी साठी पहिले अपत्य कन्या म्हणून जन्मली तर त्या माता भगिनी चा सत्कार करून कपडे म्हणू भेट दिली.
सर्व आरोग्य सुविधा अभ्यासू स्टाफ मतदार संघात असून रूग्ण कल्याण समिती च्या माध्यमातून सर्व विषय जिल्हा स्तरावर मार्गी लावण्यासाठी सतत पाठपुरावा असतो.."
नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज इमारती मतदार संघात उभारल्या..
*"शेती व्यवस्था"*
"नाला सरळीकरण करून शेतकरी बांधवांच्या शेतीला पाण्याचा एक सोर्स तयार करून नवीन सिमेंट बंधारे मंजूर करून त्या देऊन शेतीचा बहूतांश ओलीताखाली आणण्याचे पाणीदार काम करून वृक्षसंवर्धनाचे ही काम केले..."
*कृषी*
"जिल्हातील महिला भगिनीचा प्रश्न स्वच्छता गृहाचा जिल्हा नियोजन समिती च्या माध्यमातून मार्गी लावला."
"तसेच जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन मधून विधवा महिलांना शेळी गट वाटप करून आधारवड म्हणू समर्थ पणे पाठीशी राहिल्या आहेत."
*समाजकल्याण*
वैयक्तिक लाभाच्या योजनेतून अपंगांना 25 हजार रूपये ची मदत तर जिल्हा परिषद मधून 5% सेस मधून 2 हजार मदत पाणबुडी मोटार, यांचा मिळवून दिला.
*घरकुल योजनेत सर्वात लाभ जिल्हाला.*
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजनेतून सर्वात लाभ मिळवून दिला बेघरांना घर मिळवून दिले..
*कु.सक्षणा सलगर या अनेक विकासाच्या कामात स्वतःला झोकून घेऊन कामे करत असतात जनसेवेचा वारसा जपण्याचे काम करत आहेत.*
*कु.सक्षणा सलगर सारख्या जनसेवा करणा-या युवतीला पक्षश्रेष्ठी नी ग्रामिण जनतेशी नाळ असलेल्या शेतकरी बांधवांच्या या मुली ला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा दिली आगामी काळात राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या पदाधिकारी जिल्हा परिषद,पंचायत समिती मध्ये बहूतांश सर्व युवती या स्थानिक स्वराज संस्थेत लोकप्रतिनिधी म्हणून मिनी मंञालयाचे कामकाज करतील अशा अपेक्षा बाळगतो..*
*कु.सक्षणा ताई सलगर यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड होऊन 4 वर्ष पूर्ण होत आहेत सामान्य शेतकरी कुटूंबातील मुलगी स्थानिक स्वराज संस्थेत सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषद पंचायत समिती मध्न वरिष्ठ सभागृहात जावा असे स्वप्न स्व.यशवंतराव चव्हाण यांचे होते ते पूर्ण करणारी जिल्हा परिषद म्हणून उस्मानाबादला यजमान लाभले आहे..*
No comments:
Post a Comment