वडगाव निंबाळकर:- २ सराईत दरोडेखोरांकडून वडगाव निंबाळकर येथील दरोडा, घरफोडी ,जबरी चोरी तसेच इंदापूर ( काटी) येथील दरोडा असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आला ,इंदापूर पोलिस स्टेशन गुन्हा र नं 1218/2020 भा द वी 395 नुसार दाखल गुन्ह्यात आरोपी यांनी दरोडा टाकते वेळी दरवाज्यावर दगड टाकून घरात प्रवेश करून फिर्यादी महिला आणि घरात असलेली लहान मुलगी यांस कोयत्याचा धाक दाखवून घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि 1 मोबाईल असा एकूण 1लाख 7 हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन गु र नं 61/2021भा द वी 395 सदरच्या गुन्ह्यात देखील आरोपी यांनी कोयत्याचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने 2 मोबाईल असा। ऐकून 2लाख 16 हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता तसेच वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 62/2021 भा द वी 457,380 तसेच वडगाव निंबाळकर पो स्टे गु र नं 313/2020 भा द वी 392,34 वरील सर्व गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने cc tv फुटेज आणि रेकॉर्ड वरील आरोपी यांची माहिती घेत गोपनीय माहिती वरून इसम नामे१) *विकास किरण शिंदे वय 25 वर्षे रा नांदल ता फलटण जि सातारा २) रावश्या कोब्या काळे वय 25 वर्षे रा काटी ता इंदापूर* जि पुणे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता वरील दोन्ही ठिकाणचे दरोडे आणि घर फोडी तसेच जबरी चोरी चा गुन्हा आपले इतर साथीदार मार्फत केल्याचे सांगत आहेत. वरील दोन्ही आरोपी ना पुढील तपास कामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले असून इतर आरोपी चा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख सो , अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांचे मार्गदशनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे
पो हवा अनिल काळे,पो हवा रविराज कोकरे,
पो ना राजू मोमिन,पो ना विजय कांचन,पो ना अभिजित एकशिंगे,पो कॉ धिरज जाधव तसेच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे ,पो ना पानसरे, पो कॉ अक्षय सिताफ, पो कॉ हिरामण खोमणे , अमोल भुजबळ, भाऊसाहेब मारकड, यांनी केली आहे
No comments:
Post a Comment