सातारा(दिनेश लोंढे):- दि.१० -जावली तालुक्यातील बेलावडे गावची निवडणूक नुकतीच पार पडली त्यामध्ये धुंदीबाबा पॅनलचे जेष्ठ नेते बापूराव गायकवाड गुरुजी यांचे मार्गदर्शनाखाली व पॅनल प्रमुख नितीन दादा शिंदे व एकनाथ रोकडे यांचे नेतृत्वाखाली विरोधी रयत पॅनलचा ७/० ने दारुण पराभव केला . ३२ वर्षाने बेलावडे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन झाले .
बेलावडे गावच्या एकूण मतांपैकी पंच्याहत्तर टक्के मतदान धुंदीबाबा पॅनलला मिळऊन विरोधी रयत पॅनेलचा धुव्वा उडवून दिला .
बेलावडे गावच्या सरपंचपदी रिपाईच्या सौ.वनिता रोकडे यांची व उपसरपंचपदी श्री अजय शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार राजे प्रतिष्टान चे नितीन शिंदे व रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे यांचे हस्ते करण्यात आला सोबत जेष्ठ मार्गदर्शक बापूराव गायकवाड गुरुजी , सुभाष शिंदे सर , हणमंत शिंदे, शरद गायकवाड इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .
No comments:
Post a Comment