बारामती व इंदापूर तालुक्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांना शासकीय जागा देण्यासाठी बारामती प्रांत कार्यालयासमोर एन.डी.एम.जे संघटनेचे तीव्र आंदोलन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, February 12, 2021

बारामती व इंदापूर तालुक्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांना शासकीय जागा देण्यासाठी बारामती प्रांत कार्यालयासमोर एन.डी.एम.जे संघटनेचे तीव्र आंदोलन

बारामती व इंदापूर तालुक्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करून घरकुलांना शासकीय जागा देण्यासाठी बारामती प्रांत कार्यालयासमोर एन.डी.एम.जे संघटनेचे तीव्र आंदोलन

*अतिक्रमणे नियमनुकुल करून घरकुल बांधण्यास परवनगी नाही दिल्यास बारामती प्रांत कार्यालयाच्या आवारात घर बांधू*.....*वैभव धाईंजे*
बारामती : नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेमार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरवात झाली.बारामती प्रांत कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले . बारामती व इंदापूर तालुक्यातील सर्व जाती-धर्मांच्या गोरगरिबांना घरकुल मिळण्यासाठी सर्व घरकुल लाभार्थ्यांना गायरान गावठाण व अन्य प्रकारची शासनाच्या ताब्यात असलेली शासकीय जमीन घरकुल बांधण्यासाठी मिळावी म्हणून तसेच बारामती व इंदापूर तालुक्यातील सर्व गावांमधील शासकीय जमिनींवरील निवासी अतिक्रमणे नियमित व नियमानुकूल करण्यासाठी निदर्शने करून तीव्र आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य महासचिव डॉ.केवल उके व राज्य सचिव वैभवजी गीते साहेब यांच्या मार्गदर्शनात राज्य व्यवस्थापक अंपल खरात , संजय वाघमारे , ॲड.अमोल सोनवणे,ॲड.बापुसाहेब शिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले.वैभव धाईंजे यांनी प्रास्ताविक करून बारामती व इंदापूर तालुक्यातील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत भीषण परिस्थिती सर्व गावांमध्ये घरकुलांचा व घरकलांसाठी जागा नाही हा प्रश्न संबंध दोन्ही तालुक्याचा आहे हे जनतेसमोर मांडले.मयूर कांबळे यांनी प्रशासनास धारेवर धरून सर्व पाठपुरावा करून यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.रिपाइंचे बारामती तालुका सरचिटणीस संजय वाघमारे व गिरीश लोंढे,वैभव शिवशरण.आंदोलनाला वाढता प्रतिसाद पाहता तहसीलदार बारामती यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन निवेदन घेतले व वैभव धाईंजे इंदापूर तालुका अध्यक्ष नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टिस,उपाध्यक्ष धनाजी गायकवाड,कार्याध्यक्ष अनिल बागव,नंदा धाईंजे यांनी बारामती प्रांत अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा केली व येत्या आठ दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करू व यात काही अडचण येत असेल तर ती चर्चेत मांडता येईल असेल बारामती प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.निवेदनात सन 2020-21 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर 2020 रोजी च्या राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून दिनांक 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत "महा आवास अभियान ग्रामीण" राबविण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे.
सर्वांसाठी घरे 2022 या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना,आवास योजना पारधी आवास योजना,आदिम आवास योजना,अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना व इतर या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजना ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करनेसंदर्भात ज्या शासकीय,गावठाण, गायरान,शेती महामंडळ, व इतर जागेतील जागा व घरे नियमाकुल करण्याच्या संदर्भात तालुका प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे पाऊल अथवा कार्यवाही केली नाही त्यामुळे शासन निर्णयांची व शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे अनेक जाती धर्मातील गोरगरीब घरकुल लाभार्थी हक्काच्या घरापासून व जागा व घरे नियमानूकुल होण्यापासून वंचित आहेत.
पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे 2011 पूर्वीपासून शासकीय जागेत राहणाऱ्या लोकांच्या नोंदी नमुना नंबर आठ ला नोंदी घेतलेल्या नाहीत.ग्रामसेवकांनी आर्थिक तडजोडी करून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे व चुकीची दिशाभूल करणारा अहवाल ऑनलाईन पंचायत समितीस व तहसीलदार तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयास पाठवला आहे.नव्याने तालुक्यातील सर्व गावांचा फेरसर्वे करावा.सर्व नोंदी कायदेशीर घेण्यात याव्यात.कुणावरही अन्याय होणार नाही कोणीही या सर्व लाभांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. व गटविकास अधिकारी पंचायत समिती,अधीक्षक भूमिअभिलेख,तलाठी,ग्रामसेवक,मंडल अधिकारी, यांची संयुक्त बैठक घेण्यात यावी.
तरी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास VBयोजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महाआवास ग्रामीण राबवून सर्व शासकीय जागेतील अतिक्रमणे नियमानुकूल न केल्याने व घरकुल साठी शासकीय जागा न दिल्याने पंढरपूर जि.सोलापूर या तहसील कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी मोर्चा व तीव्र आंदोलन व निदर्शने केली आहेत.यावेळी अंपल खरात महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक NDMJ ,संजय वाघमारे बारामती तालुका अध्यक्ष NDMJ,धनाजी गायकवाड इंदापूर तालुका उपाध्यक्ष NDMJ ,अनिल बागाव इंदापूर तालुका कार्याध्यक्ष NDMJ, बिरु माने इंदापूर तालुका सचिव NDMJ,संदीप साबळे,विशाल सोनवणे,आदित्य सरवदे,संजय वाघमारे , आकाश भोसले,विजय चितारे,गणेश शिंदे,ॲड. बापूसाहेब साबळे,मयुर कांबळे ,केशव शेलार , पंढरपूर तालुक्यातून परमेश्वर गेजगे,बबन नवगिरे, नवनाथ गेजगे व विनायक गायकवाड,सुमित घोडके, शंकर थोरात, धर्मेंद्र लोंढे,ॲड.अमोल सोनवणे ॲड.बापुसाहेब शिलवंत, अनिकेत मोहिते,अनिल केंगार मी आंबेडकरवादी सामजिक संघटना इंदापूर तालुका अध्यक्ष, शितलताई साबळे सामाजिक कार्यकर्त्या, उज्वला गायकवाड सामाजिक कार्यकर्त्या , ज्योती ढाळे सामाजिक कार्यकर्त्या, नंदा धाईंजे सामाजिक कार्यकर्त्या , हिरामन लोंढे हे सर्व बारामती व इंदापूर तालुक्यातून सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment