बार्टीने येरवडा संकुल येथे प्रशिक्षण केंद्र सुरु करावे..डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत काम कर्मचाऱ्यांनी करावे.:-- मा. श्री. श्याम तागडे , प्रधान सचिव सामाजिक न्याय विभाग
पुणे :- ( प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे ही संस्था सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था असून बार्टीच्या विविध योजना तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बार्टी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे .डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत काम करून कर्मचाऱ्याने आपल्या कामात दर्जेदार पणा आणून योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव मा. श्री. श्याम तागडे यांनी व्यक्त केले. शनिवार दिनांक 13 फेब्रुवारी 2021 रोजी मा. श्री. श्याम तागडे यांनी बार्टी मुख्यालय पुणे येथे भेट देऊन बार्टीच्या विविध योजनांचा आढावा घेतला. मुख्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.. मा. श्री. धम्मज्योती गजभिये ,महासंचालक बार्टी पुणे ,यांनी मा. श्री. श्याम तागडे, प्रधान सचिव यांना "महामानव "हे पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी प्रधान सचिव यांनी बार्टी येरवडा संकुल येथे भेट दिली व संकुलातील शासकीय मुला मुलांची निवासी शाळा, नवीन इमारत, प्रशिक्षण विभाग, पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय, संकुलातील वसतीग्रह, ग्रंथालय,भोजन कक्ष, प्रशिक्षण हॉॕल आदिना भेट देऊन पाहणी केली. येरवडा संकुल येथे बार्टीने प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. असे निर्देश यावेळी दिले. बार्टीच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती मा. श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी ,पुणे यांनी दिली. मा. श्री. श्याम तागडे यांच्या हस्ते येरवडा संकुल, पुणे येथे बुद्धगया येथुन आणलेल्या बोधिवृक्ष रोपाचे रोपण करण्यात आले. यावेळी मा. श्री. डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण मा. श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, आयुक्त, दिव्यांग कल्याण मा. श्री. धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे, मा. श्री. दिनेश डोके, अतिरिक्त आयुक्त, समाज कल्याण, मा. उमेश घुले, निबंधक, बार्टी पुणे, श्रीमती दीप्ती सूर्यवंशी, विभाग प्रमुख योजना. मा.मेघराज भाते, विभाग प्रमुख, मा. रवींद्र कदम, विभागप्रमुख, श्रीमती स्वाती मोकाशी, लेखाधिकारी, मा नितीन सहारे, प्रकल्प व्यवस्थापक, डॉ.मुकेश दुपारे, सुमेध थोरात, श्रीमती जयश्री चेंडके, मुख्याध्यापिका, आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
No comments:
Post a Comment