*दलित समाजातील तरुणांनी पँथरप्रमाणे आता पेटून उठायला हवे - डाॅ.घन:शाम भोसले*
सातारा(दिनेश लोंढे):-,दि.५ :- महाराष्ट्रात ठिकठिकाणी दलितांवर अन्याय व अत्याचार करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दलित समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे सरकारने वेळीच दलित समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराची दखल घेवून तातडीने कारवार्इ करावी यासाठी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी महाराष्ट्राचा धावता दौरा सुरू केला आहे.
एखाद्या दलितावर अन्याय झाल्याची घटना घडली की, दलित संघटना एकत्र येतात, पण दलित समाजामध्ये फूट पाडून, जाती जातींमध्ये भांडणे लावून, स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न काही लोक करतात त्यामुळे राजकारणामुळे निर्माण होणारा तो जातीयवाद दूर करायला हवा. ज्या महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समाजसुधारकांनी सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचले, संपूर्ण देशाने त्यांच्या विचारांचा आदर्श घेतला, त्यांच्या नावाने पुरोगामी महाराष्ट्र अशी ओळख मिळाली, त्याच महाराष्ट्रातील दलितांवर अन्याय व अत्याचार करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ते लवकरात लवकर थांबवण्यासाठी दलित पँथरच्या राष्ट्रीय अध्यक्षा मलिका ढसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली दलितांवर होणारे हल्ले, हत्या थांबविण्यासाठी व्यापक सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी तसेच दलितावर अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याने दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डाॅ.घनःशाम भोसले यांनी महाराष्ट्र द्वारा सुरू केला आहे त्यांनी भंडारा जिल्हा, नागपुर जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, सातारा जिल्हा द्वार्यावर दलित पँथर च्या जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली तसेच या द्वार्यावर दलित पँथर चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय लुटे, महिला आघाडीच्या भंडारा जिल्हाध्यक्ष कविता बोधे आणि गोंदिया जिल्हा अध्यक्ष वानखेडे तसेच दलित पँथर चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दलित समाजासाठी जे काही करता येईल ते करण्याचा दलित पँथर ही संघटना नक्कीच प्रयत्न करेन तसेच अन्याय - अत्याचाराविरोधात ‘दलित पँथर’च्या नव्या रणनीतीसह जातिअंताची लढाई लढण्यासाठी सर्वांनी सिद्ध झाले पाहिजे. चळवळीचा वचक, दरारा निर्माण केला पाहिजे. दलित समाजातील तरुणांनी पँथरप्रमाणे आता पेटून उठायला हवे असे आवाहन दलित पॅथर चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डाॅ घनःशाम भोसले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment