*मयत व्यक्तीच्या वारसास अनुकंप तत्वावर कामावर घेण्यात यावे यासाठी दलित पँथरने मुख्याधिकारी यांना दिले निवेदन*
फलटण,दि.५ :- दलित पँथर संघटनाही शोषित, पिडीत,वंचित,अन्याय अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय देण्याचे कार्य करीत असते. फलटण तालुका येथील फलटण नगर परिषद येथे (बागखाते) कामगार म्हणून काम करण्याऱ्या श्रीमती कांताबाई बबन रणदिवे यांचा दि.२६ फेब्रुवारी २०१३ रोजी मयत झाल्या होत्या त्यांच्या एकमेव वारस अर्चना बबन रणदिवे (मुलगी) असल्याने त्यांनी दि.२२ जानेवारी २०१४ रोजी आपलेकडे अनुकंप तत्वावर कामगार घेणे कामी अर्ज केला होता परंतु नगर परिषदचे भ्रष्टाचाराने माखलेल्या माजलेल्या रान बोक्यांनी दलित अबला महिलेची दिशाभुल करण्याचे कट कारस्थान केले असुन आजरोजी ६ वर्ष पुर्ण झाली तरी त्याची मुलगी न्यायाच्या प्रतिक्षेत असुन तीच्या नंतरच्या मयत व्यक्तीच्या वारसदांराच्या अनुकंप तत्वावर नियूक्त्या करून श्रीमती अर्चना बबन रणदिवे या अबला महिलेवर अन्याय करण्याचा कुटील डाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आखला असुन हे दलित पँथर कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्र शासन अनुकंपा यादीतील उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करीत असले तरी फलटण येथील भ्रष्ट अधिकारी शासनाच्या धोरणांची अमंलबजावणी करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे.
या अन्याय अत्याचाराच्या विरोधात दलित पँथर संघटना तीव्र आंदोलन करेल व याची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषदच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहील तरी श्रीमती अर्चना बबन रणदिवे यांची अनुकंप तत्वावर नियुक्ती करण्यात यावी यासाठी दलित पँथरने फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदन देते वेळी दलित पँथरचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष महेश गायकवाड, सातारा जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वि. काकडे, फलटण तालुका अध्यक्ष मंगेश प्र.आवळे, फलटण शहर अध्यक्ष
आकाश भा.काकडे, फलटण तालुका सरचिटणीस देवबा दा.जगताप,फलटण शहर उपाध्यक्ष बापुराव अ.सावंत, फलटण तालुका उपाध्यक्ष,फिरोजभाई मे.मुलाणी, फलटण तालुका कार्याध्यक्ष रोहित य.अहिवळे, फलटण शहर सरचिटणीस राकेश रा.पवार, फलटण शहर उपाध्यक्ष राम व.पवार, फलटण शहर संघटक रोहित सं.अडागळे तसेच दलित पँथरचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment