बारामती लोकसभा मतदार संघात एकापाठोपाठ मुलींवर अत्याचाराच्या घडतायेत घटना...बापानेच केला मुलीवर बलात्कार.. बारामती-दौड(प्रतिनिधी):-बारामती लोकसभा मतदार संघात चाललंय काय मुली सुरक्षित नसल्याने आपल्या भावना संतप्त करताना नागरिक बोलत आहे, अशीच एक काळिमा फासणारी घटना नुकताच घडली असून
बापानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर
बलात्कार केल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.मिळालेल्या माहितीनुसार दि.19/02/2021 रोजी सायं.6:00 चे सूमारास वडगांवबांडे ता.दौंड जि.पुणे या गांवचे हददीत फिर्यादी राहत असलेल्या खोलीत पिडीत मुलीचा वडीलाने मुलगी(वय 13 वर्षे 4 महिने) ही अल्पवयीन असल्याचे माहीत असताना सुध्दा मुलगीवर जबरदस्तीने शारीरीक संबध केले आहेत.याबाबत यवत पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे. मानवतेला काळिमा फासणार्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रवृत्तीला फाशीची शिक्षासुद्धा कमी पडेल असे कृत्य हे नराधम करू लागले आहेत, त्यामुळे अशा नराधमांना कठोर शिक्षा होणे गरजेचे बनले आहे.आरोपी विरूध्द त्याच्या पत्नीने फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि कापरे करत आहेत.अश्या घटना वारंवार का घडत आहे नात्याला काळिमा फासणारे कृत्य बारामती तालुक्यात घडले नात्याने बहीण असणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची बातमी आली तर याच तालुक्यात एका महिलेचा सांगाडा सापडला असून त्याचा शोध सुरू आहे यावरून तरी किमान शक्ती कायद्याचा काय उपयोग असं म्हणण्याची वेळ जनतेतुन ऐकावयास येत आहे,बारामती लोकसभा मतदार संघात अश्या एका पाठोपाठ काळिमा फासणाऱ्या घटना घडत असतील तर याला जबाबदार कुणाला धरायचे येथील कायदा सुव्यवस्था कमी पडतेय का असा प्रश्न निर्माण झाला असल्याने भावना व्यक्त होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment