बनावट नोटांचे गोडाऊन दाखवतो म्हणून एक लाखाची फसवणूक, आरोपी अटक.... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 23, 2021

बनावट नोटांचे गोडाऊन दाखवतो म्हणून एक लाखाची फसवणूक, आरोपी अटक....

बनावट नोटांचे गोडाऊन दाखवतो म्हणून एक लाखाची फसवणूक, आरोपी अटक....                                                                                   पुणे:-दिनांक २१/०२/२०२१ श्री अर्जुन मोहिते सहायक पोलीस निरीक्षक, नेमणुक दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीण असे हजर असताना श्री अर्जुन मोहिते सहा पोलीस निरीक्षक यांना
बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रांजणगाव ता. शिरुर जि. पुणे येथे फॅक्टरी सद्ृश पत्र्याचे एका गोडाउनमध्ये १०० कोटी रूपयांच्या बनावट नोटा असुन सदर नोटा इसम नामे सिकंदर राम रा. मुंबई याचे मार्फतने मिळु शकतात परंतु सिकंदर राम हा त्या साठी १,००,०००/- रू रक्कमेची मागणी करीत असुन
तो मला कळंबोली नवी मुंबई येथे भेटन्यास येणार आहे, वरील मिळाले माहिती बातमी वरीष्ठांना कळवुन पोलीस पथक तयार केले.दिनांक २२/०२/२०२१ रोजी पहाटे ०३.०० वाचे सुमारास ब्रिज जवळ मिळालेल्या बातमी प्रमाणे एका लाल रंगाचे हुंडाई कंपनीची आय टेन कार क्रंमांक एमएच ०३ ए झेड ०५०२ मधुन एक इसम तेथे आला त्यास साध्या वेशातील पोलीसांनी बनावट नोटाबाबत विचारपुस केली असता त्यांनी ठरले प्रमाणे १ लाख रू आणले आहेत काय असे विचारले व १ लाख रू घेतले व माझे सोबत चला मी बनावट पैशाचा गोडावुन दाखवतो असे सांगुन तेथुन कळंबोली एक्सप्रेस हायवे रोडने लोणावळा तळेगाव दाभाडे व तेथुन पुन्हा जुना मुंबई पुणे हायवे रोडने चाकण, शिक्रपुर रांजणगाव येथे आला असता त्याने त्याचे ताब्यातील कारचे स्पीड आणखी वाढवुन रांजनगाव येथे यांबला नाही म्हणुन पथकास विश्वासाईतेबाबत शंका आल्याने आरोपी याची कार ओव्हरटेक करून सकाळी १०.४९ वाजन्याचे सुमारास थाबवुन त्याच ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारपुस केली असता सदर आरोपी यांने त्याचे ०१) सिकंदर परमेश्वर राम वय ३२ वर्ष रा. परमेश्वर राम रूम नंबर १८३ एफ.ओ डब्लु पी आंबेडकरनगर ,खान अब्दुल गफार खान मार्ग वरळी सिरफीयस वरळी डेरी हत्मेंटस वरळी मुंबई ४०० ०१८ असे सांगुन इतर साथीदार प्रशांत झुटानी ,के. पी. सिंग रा. सुरत
गुजरात यांनी अपसात संगनमत करून इसम नामे सिंकदर परमेश्वर राम याने बनावट चलनी नोटाचे गोडावुन दाखवतो अशी पोलीस अधिकारी यांना खोटी माहिती देवुन त्यापोटी रक्कम रु १,००००० अक्षरी एक लाख रू रोखीने कळंबोली नवी मुंबई येथे स्वीकारून बनावट नोटांचे गोडवून न दाखविता आमची फसवणुक केली आहे म्हणुन ०१) सिकंदर परमेश्वर राम वय ३२ वर्ष रा. परमेश्वर राम रुम नंबर १८३ एफ.ओ डब्लु पी आंबेडकरनगर खान अब्दूल गफार खान मार्ग वरळी सिफीयस वरळी डेरी हत्मेंटस वरळी मुंबई ४०० ०१८, ०२) कमलेश जैन ०३) प्रशांत झुटानी ०४) के.पी.सिंग रा. सुरत गुजरात यांचे विरूध्द
भादवि कलम ४२०,१८२,२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री खानापुरे हे करीत असुन सदर गुन्हयातील आरोपी सिकंदर परमेश्वर राम वय ३२ वर्ष रा.परमेश्वर राम रुम नंबर १८३ एफ.ओ डब्लु पी आंबेडकरनगर खान अब्दुल गफार खान मार्ग वरळी सिरफीयस वरळी डेरी हत्मेंटस वरळी मुंबई ४०००१८ यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  शिरूर यांचे समक्ष हजर केले असता त्यास दि. ०२/०३/२०२१ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री खानापुरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment