निरंकारी मंडळातर्फे बाबा हरदेव सिंहजी जन्मदिवस वृक्षारोपणाने साजरा
बारामती - निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या ६७ व्या जन्मदिनी संत निरंकारी मिशनतर्फे दि. २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान देश-विदेशात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रत्येक निरंकारी परिवाराने जास्तीत जास्त रोपे लावून त्याचे तीन वर्षांपर्यंत संगोपन व संरक्षण करावे, हा अभियानाचा उद्देश असून, बाबा हरदेव सिंहजी महाराजांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण साकार करावे, असे आवाहन करण्यात आले.*
*विद्यमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने संत निरंकारी मंडळाच्या बारामती शाखेच्या वतीने खंडोबा नगर येथील सत्संग भवनात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच या वृक्षांचे संगोपन व संवर्धनाची जबाबदारी घेण्यात आली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या लोकांत सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले.*
*याप्रसंगी संत निरंकारी मंडळ बारामती शाखेचे प्रमुख आनंद महाडिक, कमिटीचे संचालक शशिकांत सकट, वामनराव काजळे, सेवादल मोहन शिंदे उपस्थित होते.*
-----------------------------
No comments:
Post a Comment