बारामतीत चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला पेटवून देणार्या पतीला जन्मठेप...
बारामती:- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस मारहाण करून अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणार्या पतीस बारामती जिल्हा सत्र न्यायाधीश आर. आर.राठी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली.सहा वर्षापूर्वी ही घटना घडली होती. 16 ऑक्टोबर 2014 रोजी जळगाव सुपे येथील शामराव लालासाहेब जगताप यांनी त्यांची दुसरी पत्नी सुनिता शामराव जगताप हीच दारू पिऊन आल्यानंतर चारित्र्याच्या संशयावरून मारहाण केली व घरातील रॉकेलची कॅन अंगावर ओतून
पेटवले व घराला कडी लावून घेतली. यानंतर सुनिता जगताप त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावरून पोलिसांनी शामराव जगताप यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेत सुनिता जगताप यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी खून, खुनाचा प्रयत्न व मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश आर. आर. राठी
यांच्यासमोर चालली. यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एडवोकेट श्री संदीप ओहोळ यांनी कामकाज पाहिले. यामध्ये सरकारी व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य म्हणून आरोपी शामराव जगताप यास खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यामध्ये सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी चार साक्षीदार तपासले.यामध्ये सुनीता जगताप यांचा मृत्यूपूर्व जबाब व वैद्यकीय अधिकार्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.सरकार पक्षास पोलीस हवालदार अभिमन्यू कवडे यांनी तसेच प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी सहकार्य केले. याप्रकरणाचा तपास फौजदार एस. पी. गायकवाड यांनी केला होता. मुलीला सरकार कडून मदत देण्याचा आदेश देण्यात आला, त्यावेळी सुनीता व शामराव यांना घटना घडली, त्या वेळेस तीन वर्षाची मुलगी होती, आता त्या मुलीचे वय नऊ वर्षे आहे. सध्या वडील तुरुंगात आणि आईचा मृत्यू अशी परिस्थिती असल्याने या मुलीला सरकारने मदत करावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
No comments:
Post a Comment