अमरावतीमध्ये लॉकडाऊनचा चुकीचा पायंडा पाडणारे बच्चू कडू अपयशी मंत्री आहेत - उमेश चव्हाण
पुणे - अमरावतीच्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून येणारे बच्चू कडू अमरावतीमध्ये आरोग्य सुविधा उभारण्यास घोर अपयशी ठरले आहेत. आज अमरावती मध्ये करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. अचलपूर नगरपालिके पासून या लॉकडाउनची सुरुवात झाली, बच्चू कडू यांचे हे प्रचंड अपयश आहे.
शेतकरी आणि कामगारांचे नेते म्हणविणारे बच्चू कडू लॉकडाउन झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी रेशन भरून देणार आहेत का? शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा, म्हणून तीव्रतेने लोक मागणी असताना मंत्रीपदाला चिटकून बसणारे बच्चू कडू शेतकऱ्यांचे वीज बिल माफ होणार नाही तोपर्यंत पगार घेणार नाही. अशी घोषणा करतील काय ? अशी घणाघाती टीका रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांच्यावर केली आहे.
टॉवरवर चढून पाण्याच्या टाकीवर चढून लक्ष वेधून घेणारे आंदोलन करताना ते केवळ प्रसिद्धीसाठी होते का ? तलाठी आणि तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये साफ सोडणारे बच्चू कडू ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयांमध्ये साप सोडायची हिम्मत दाखवणार का ? बच्चू कडू यांची भंपक बाजी, सत्तेचा लोभ आणि प्रसिद्धीलोलूप पणे लोकांना फसविणारे उद्योग आता अमरावतीकर नागरिकांच्या लक्षात आले आहेत. यापुढे बच्चू कडू निवडून येणार नाहीत. असे देखील रुग्णहक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.
No comments:
Post a Comment