बारामती शहर पोलीस स्टेशन कडून घरफोडीत चोरीस गेलेला माल फिर्यादीस परत
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन हददीत मागील काही दिवसात घरफोडीचे प्रमाण वाढले होते त्यामध्ये १) बारामती शहर पो.स्टे.गु.र.नं.२२५/२०१९ भा.द. वी.का क.३८०,४५७ प्रमाणे दिनांक ०६/०३/२०२० रोजी फिर्यादी नामे संतोश दत्तात्रय कुलकर्णी वय.४८ वर्षे रा.खत्रीपार्क,श्री गजानन बंगला बारामती हे कुटुंबासह दिनांक ०५/०३/२०२० रोजी बाहेरगावी गेले होते ते पुन्हा दिनांक ०६ / ०३/२०२० रोजी घरी परत आले असता घराचा कडी कोंयडा तोडुन घरातील एकुन ६५,०००/ रूपये किमतीचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झालेली होती.त्यावरून त्यांनी दिलेले फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल होता. २) बारामती शहर पो.स्टे.गु.र.नं.३५४/२०१९
३०/०४/२०२० रोजी फिर्यादी नामे संतोष म्हसु गायकवाड वय.५२वर्ष रा.वसंतनगर बारामती जि.पुणे हे त्यांचे कुटूंबासह दिनांक २९/०४/२०१९ रोजी बाहेरगावी गेले होते ते पुन्हा दिनांक ३०/०४/२०१९
रोजी घरी परत आले असता घराचा कडी कोंयडा तोडुन घरातील एकुन ६४,१००/- रूपये किमतीच्या सोन्याचे दागिन्यांची चोरी झालेली होती.त्यावरून त्यांनी दिलेले फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल होता.सदर घरफोडीचा शोध घेण्याबाबतच्या सुचना मा.पोलिस अधिक्षक श्री अभिनव देश्मुख व
मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.मिलींद मोहीते ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर यांनी केलेल्या होत्या त्यावरून मा.पोलीस निरीक्षक श्री नामदेवराव शिदे व त्यांचे स्टाफने अज्ञात चोरटयाचा कसोशिने शोध सुरू केला होता.सदर घटनेचा शोध घेत असताना सहा. पोलीस निरीक्षक श्री प्रकाश
वाघमारे,व गुन्हे शोध पथकाचा स्टाफ पो.ना.दादा डोईफोडे,पो.ना.ओंकार सिताप,पो.कॉ.सुहास लाटणे.अविनाश दराडे,दशरथ इंगोले,योगेश कुलकर्णी,तुषार चव्हाण,अकबर शेख,अतुल जाधव यांनी समांतर तपास करून दोन्ही गुन्हयातील आरोपी नामे १) बेरडया उर्फ नियोजन संदिप भोसले वय.२८वर्ष रा. सोनगाव ता.बारामती जि.पुणे यास अटक करून त्याचेकडुन वरील दोन्ही गुन्हयातील मुददेमाल जप्त करण्यात आलेला होता.तो
आज दिनांक ०४/०२/२०२१ रोजी यातील फिर्यादी यांना परत करण्यात आले.सदर वेळी कॅनरा बॅकेचे मुख्य प्रबंधक श्रीशैलेश दराडे,पोलीस निरीक्षक नामदेवराव शिदे,पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव, पो. हवा.ढोले हे उपस्थित होते.सदरवेळी चोरीस गेलेला मुददेमाल परत मिळेल असे कधीही वाटले नव्हते परंतु आमचा चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जशाचे तसे परत मिळाल्याचे व खुप आनंद झाला असल्याचे फिर्यादी यांनी सांगुन पोलीस दलाचे अभार मानले आहेत.
No comments:
Post a Comment