*गरीब कष्टकरी महिलांना रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने मोफत औषधांचे वाटप*
पुणे :-रुग्ण हक्क परिषदेच्या सदस्य नोंदणी अभियानाअंतर्गत महिलांची नियमित तपासणी करण्यात येते. शिवजयंतीनिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट आणि ताडीवाला रस्ता भागातील महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये खूप हॉस्पिटलच्या डॉ. दीपा अमोल देवळेकर यांनी आणि त्यांचे सहकारी डॉक्टर पथकाने सर्व महिलांची आरोग्य तपासणी केली.
या उपक्रमा अंतर्गत ज्या गरीब महिलांनी तपासण्या करून घेतल्या, त्यांच्यासाठी आज रक्त वाढीसाठीच्या, हिमोग्लोबिन वाढीसाठीच्या, कॅल्शियम आणि विटामिन ची एक महिना पुरतील अशी औषधे आज त्या भागात काम करणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेच्या पदाधिकारी अनुप्रिता दीक्षित यांच्याकडे आज परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते सुपूर्द केली. आम्हाला आशा आहे की पुढील काळात येथील सर्व माता भगिनींचे आरोग्य सुधारलेले असेल.
No comments:
Post a Comment