आमदार रोहित दादा पवार विचार मंच दिनदर्शिकेचे सुनंदा पवार यांचे हस्ते प्रकाशन*
बारामती:-रविवार दिनांक 07/ 02/ 2021 रोजी शारदानगर येथील सृजन सभागृहात आमदार रोहित दादा पवार विचार मंच महाराष्ट्र प्रदेश दिनदर्शिकेचे प्रकाशन शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या मुख्य विश्वस्त तथा ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या अध्यक्षा सौ सुनंदा वहिनी पवार यांच्या शुभहस्ते झाले.कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका रोहितदादा पवार विचार मंचाचे अध्यक्ष रितेश गायकवाड यांनी केले होते.
यावेळी बोलताना सौ सुनंदा पवार यांनी सांगितले की कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघातील दुष्काळ दूर करणे हे आमदार रोहित दादा यांचे प्रथम लक्ष आहे. रोहित दादा विचार मंचाचे काम करत असताना कार्यकर्त्यांनी सर्वांशी प्रेमाने वागावे. कोणाचाही द्वेष करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजाला उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करावे. महिला सबलीकरण, व्यसनमुक्ती, शेती, फलोत्पादन,पशुपालन,शिक्षण,विज्ञान,जलसंधारण अशा विविध विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यकर्त्यांनी अगोदर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण व्यवस्थित करावे व उरलेल्या वेळात रोहित दादा पवार विचार मंचाचे काम करावे असे सांगितले. व्यसनाधीनता हा समाजाला लागलेला शाप असून त्यापासून विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी दूर राहावे असे आवाहन त्यांनी केले.
येणाऱ्या काळात रोहित दादा पवार विचार मंचाच्या कार्यकर्त्यांबरोबर परिसंवाद आयोजित करून कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम कसे राबवावेत, समाजाशी कशा पद्धतीने सुसंवाद साधावा याबाबतचे मार्गदर्शन करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहितदादा पवार विचार पंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू पाटील बोबले होते. यावेळी राज्य कार्याध्यक्ष अमोल पाटील,जिल्हा उपाध्यक्षा सुप्रिया बर्गे,बारामती शहराध्यक्ष गौरव जाधव यांच्यासह राज्यातील कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड सर यांनी केले
No comments:
Post a Comment