सर्वसामान्यसाठी खुशखबर, १५०० स्वेअर
फूटापर्यंतच्या बांधकामाला परवानगीची गरज नाही- नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद(प्रतिनिधी):- :महाविकास आघाडी च्या सरकारने म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील सर्व सामन्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. १५०० स्वेअर फुट बांधकामाला आता
परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी
सांगितले. ज्या बांधकामाला परवानगी आवश्यक आहे, ती केवळ १० दिवसात मिळेल असेही ते म्हणाले. औरंगाबाद दौर्यावर आले असता त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला, त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नगरविकास विभागाच्या वतीने बांधकाम परवानाबाबत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे राज्यातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयानुसार १५०० स्वेअर फुटापर्यंत बांधकाम करण्यासाठी यापुढे महानगर पालिकेची परवानगी घेण्याची आवश्यकता नसेल. या
बरोबरच यापुढे अनधिकृत झोपडपट्टी होऊ नये या साठी राज्य सरकार प्रयत्न करत
असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment