महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण साठी महिला बाल कल्याण चे कार्य कौतुकास्पद:-- सुनेत्रा वहिनी पवार - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 15, 2021

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण साठी महिला बाल कल्याण चे कार्य कौतुकास्पद:-- सुनेत्रा वहिनी पवार

*महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण साठी  महिला बाल कल्याण चे कार्य कौतुकास्पद:-- सुनेत्रा पवार* 

महिला बाल कल्याण च्या वतीने लाभार्थी ना निधी व प्रमाणपत्र  वाटप 

बारामती: महिलांनी स्व:बळावर आर्थिक सक्षम होणे साठी विविध योजना राबविणे व दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये आदी बाबत  बारामती नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समिती चे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन बारामती हाय टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार केले आहे.सोमवार दि.15 फेब्रुवारी रोजी बारामती नगरपरिषद च्या महिला बाल कल्याण समिती च्या वतीने नगरपरिषद च्या सभागृहात  महिला,महिला बचत गट  व विद्यार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून धनादेश व प्रमाणपत्र वाटप व बारामती बस स्थानकास व्हील चेअर वाटप  या  प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव, मुख्यधिकारी किरणराज यादव,नगरसेवक किरण गुजर, महिला बाल कल्याण च्या सदस्या नगरसेविका कमल कोकरे, आशा माने,अनघा जगताप,बेबी मरियन बागवान  आणि  नलिनी मलगुंडे,शीतल गायकवाड,नीता चव्हाण,सुरेखा चौधर,निलिमा मलगुंडे   संगीता सातव आदी नगरसेविका व नगरसेवक उपस्तीत होते.
महिला स्वतः जिद्द चिकाटी च्या जोरावर संसार चालवत असताना ना त्यांना आर्थिक मदत झाल्यास व विविध कोर्सेस साठी साह्य मिळाल्यास  मोठ्या प्रमाणात  यश मिळवता येते हे महिलांनी विविध क्षेत्रात दाखवून दिले आहे त्यामुळे महिला,महिला बचत गट व विद्यार्थ्यांना  बारामती नगरपरिषद महिला व बाल कल्याण  समिती सहकार्य करून आर्थिक स्वलंबन साठी साह्य करते ही बाब म्हतपुर्ण व समाधानाची असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
बारामती नगरपरिषद चा महिला व बालकल्याण विभाग  नेहमी महिलांचा आर्थिक विकास होणे साठी व विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित करणेसाठी  साठी कटिबद्ध असल्याचे नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी सांगितले.

"दिव्यंग स्वयंरोजगार योजना साठी 32 लाभार्थी,प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल साठी हिस्सा देणे साठी 1 लाभार्थी, प्रतिभा व्यवसाईक प्रशिक्षण कोर्सेस अंतर्गत संगणक कोर्सेस पूर्ण केलेल्या 80 महिला व मुलींना प्रमाणपत्र वाटप,दिनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांना 10 हजार रुपये प्रमाणे एकूण 2,20,000 रुपयांचा  फिरता निधी वाटप करण्यात येत असून बारामती बस स्थानकास दिव्यांग प्रवासी यांनी बस स्थानकात सहज संचार करता यावा म्हणून 2 व्हील चेअर प्रदान करण्यात येत असून महिलांना आर्थिक सक्षमीकरण  करण्यासाठी साह्य करून एक प्रकारे महिला व मुलीचा सन्मान करून माता सावित्री व माता जिजाऊ यांच्या विचाराचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगून विविध योजनांची माहिती "  प्रास्ताविक मध्ये महिला व बाल कल्याण च्या सभापती सौ सुहासिनी सातव यांनी दिली.या वेळी उपस्थित प्रत्येक लाभार्थी व बारामती बसस्थानक चे आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी या कार्याबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन बारामती नगरपरिषद च्या  महिला बाल कल्याण विभाग अधिकारी सचिन  कोरे यांनी केले.


No comments:

Post a Comment