बारामती:- बारामती शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहर व तालुका पदाधिकारी निवड आणि मुलाखती घेण्यात आल्या सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष मा.विनोद भालेराव तसेच जिल्हा उपाध्यक्ष मा.हिरामण वाघमारे हे कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना येथील सत्ताधाऱ्यांची निती समजावून सांगत जर सत्ताधारी आणि प्रशासन जर सर्व सामान्यांचा आवाज ऐकणार नसेल तर ह्या बहिऱ्या व्यवस्थेला जागे करण्यासाठी भैरो को सुनने के लिये धमाके की जरुरत होती है असे म्हणत येथील प्रस्थापित बहिर्य व्यवस्थेला गोर गरीब वंचित लोकांचा आवाज ऐकाय लावणार असल्याचे सांगितले तसेच कार्यकर्ता उपाशी न राहता त्याला रोजगार देखील कसा उपलब्ध होईल यावर ही त्यांनी प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाची जबाबदारी ब्ल्यू पँथर सामाजिक विकास प्रतिष्ठान चे अध्यक्ष मा. मंगलदास निकाळजे ,सचिव अक्षय शेलार, कार्याध्यक्ष मयुर कांबळे ,विक्रम थोरात, रोहित भोसले यांच्यावर सोपवण्यात आली होती कार्यक्रमाचे नियोजन एकदम व्यवस्थित पार पाडले कार्यक्रमाची सुरुवात कसबा येथील छ.शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर उर्जा भवन भिगवण रोड येथे जाऊन सुरवात करण्यात आली कार्यक्रमास भारिप बहुजन महासंघ, सम्यक विद्यार्थी आंदोलन तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थित होते मा.अमोल खरात, रियाज खान,गोरख दादा कांबळे, ऍड. सोनाली मोरे यांनी देखील कार्यक्रमास मोलाचे योगदान दिले.
Post Top Ad
Wednesday, February 10, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहर व तालुका पदाधिकारी निवड व मुलाखती
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बारामती शहर व तालुका पदाधिकारी निवड व मुलाखती
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment