बारामती शहरातील नागरीकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा-ब्ल्यू पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठानची मागणी.
बारामती:-कोरोना या साथीच्या रोगाचे थैमांड आपल्या देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला त्याचे चटके भोगावे लागत आहे व या रोगामुळे जगासह आपल्या भारत देशामध्ये सुद्धा लॉकडाऊन करावा लागला आहे त्यामुळे मागील तब्बल एक वर्षाच्या आसपास देश बंद राहीला व देश सुरूळीत चालाय खुप वेळ लागत
आहे व अजुनही कोरोनाचे संकट संपले असल्याचे दिसत नाही ते चालुच आहे, त्यामुळे देशावर आर्थिक संकट हि खुप मोठे आले असल्यामुळे नागरीकांच्या रोजगार,उद्योग,व्यवसाय,नोकऱ्या बंद पडल्या आहेत त्यामुळे नागरीकांना आर्थिक बाबीची खुप मोठी कमतरता भासत आहे त्यामुळे स्वतःचे घर देखिल कसे चालवायचे हा देखिल खुप मोठा प्रश्न नागरीकांना पडला आहे.त्यामध्येच आपल्या बारामती नगर पालिकेने घरपट्टी व पाणीपट्टी काढुन ती भरावयास सांगितली आहे व ज्या नागरीकांनी घरपट्टी व पाणीपट्टी भरली नाही त्यांना घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलांवर
शास्ती (दंड) आकारला आहे त्यामुळे सदरील घरपट्टी व पाणीपट्टी तसेच त्यावरील शास्ती (दंड) पाहुन नागरीकांच्या पोटात गोळा आला आहे त्यामुळे आपण या गोष्टीचा गांभिर्यपुवक विचार करून सातारा शहराप्रमाणे एतिहासीक निर्णय घेऊन आपल्याही बारामती शहरामधील कमीत कमी 1100 स्केअर फूट पर्यंतचे सर्व फ्लॅट तसेच घरे व कमीत कमी 300 स्केर फुट पर्यतचे गाळे शॉपची घरपट्टी व पाणीपट्टी सरसकट माफ करावी व तसेच त्यावर लावलेला शास्ती (दंड) कायमचा रद्द करावा आणि शास्ती करात सरसकट माफी दयावी अशा प्रकारचे निवेदन ब्ल्यु पॅथर सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यधिकारी यांना देण्यात आले व यावर लवकरात लवकर निर्णय जर बारामती नगर पालिकेने घेतला नाही तर तीव्र प्रकारचे पॅथरचे आंदोलन करणार असल्याचे ब्ल्यु पॅथरचे अध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी सांगितले त्यावेळी ब्ल्यु सचिव अक्षय शेलार, कार्याध्यक्ष मयुर कांबळे, विकम पंत थोरात, रोहित भोसले, नारायण लांडगे केशव शेलार, आकाश पोळके, अनिस शेख, अमर शेख आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment