उपमुख्यमंत्री अजितदादा जरा लक्ष द्या, बारामतीत लाखो रुपयांचा बुडतोय महसूल,.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 18, 2021

उपमुख्यमंत्री अजितदादा जरा लक्ष द्या, बारामतीत लाखो रुपयांचा बुडतोय महसूल,..

उपमुख्यमंत्री अजितदादा जरा लक्ष द्या,  बारामतीत लाखो रुपयांचा बुडतोय महसूल,..                                                                          बारामती:-बारामतीत विकासाची गंगा वाहिली जातेय असं म्हटलं जातंय परंतु हा विकास होत असताना किती गैर प्रकार होतात याची मालिका या वृत्तपत्र द्वारे लवकरच जनतेपुढे मांडणार आहोत, असं असताना उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी करोडो रुपये निधी आणून बारामती चा कायापालट करण्याचा संकल्प केला असला तरी त्याला तिलांजली दिली जात असल्याचे दिसत आहे, त्याचे अनेक कारणे आहेत त्यापैकी म्हणजे सद्या बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू, मुरूम, माती उत्खनन होत आहे त्याची रॉयल्टी भरली जात नसल्याने लाखो रुपये महसूल बुडत आहे याचे कुणालाच घेणे देणे नाही कारण यामध्ये अनेकांचे हात ओले झाले असल्याचे कळते, त्यामुळे तक्रार केली तरी कारवाई होणार नाही अश्या भूमिकेत काही माफिया बोलताना दिसतात, मग बारामतीचा  विकास होत असताना अधिकारी वर्ग असे का वागतात हे कळेनासे झाले या मागे काय प्रकार आहे असे अनेक तक्रारदार बोलताना दिसते,मंडल अधिकारी व तलाठी याकडे डोळेझाक करतात तर काही नी पंचनामा केला तर त्याची अधिकारी दखल घेत नसल्याचे काही तलाठी बोलतात मग लाखो रुपये महसूल बुडवून कोणाचं भले करतात उपमुख्यमंत्री अजितदादा पहाटे पासून काम करतात तर हा लाखो रुपये महसूल या विकासकामांसाठी मिळू शकतो ही बाब त्यांच्या का लक्षात येत नाही हे कोडं सुटलेले नाही याचं दुर्दैव आहे बारामतीकराना,महसूल विभाग का दुर्लक्ष करतंय दखल घेण्यास कुणाचा अडथळा येतोय याचा लवकरच पर्दाफाश करणार आहे  *याबाबत सविस्तर पुढील भागात*

No comments:

Post a Comment