कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत आवश्यकता : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत आवश्यकता : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)

कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत आवश्यकता : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)

मातीवरील आणि मॅटवरील दोन्ही कुस्ती प्रकार आवश्यक, देश/परदेशात मॅटवरील कुस्तीला प्राधान्य
                                                                      फलटण दि.२७ : कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी ताकदीबरोबर बुद्धिकौशल्य, शिस्त व शांत डोक्याची अत्यंत गरज असून त्याद्वारे कुस्तीमध्ये विजयश्री प्राप्त करता येते, याची ग्वाही देत अनेक नामवंत पैलवान बुद्धी कौशल्याच्या व्यवसायात नामवंत आहेत, एक दंतरोग तज्ञ पूर्वी नामवंत पैलवान होते, अशी माहिती देत मल्ल विद्येत बुद्धिकौशल्याशिवाय यशस्वी होता येणार नसल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी स्पष्ट केले.
        संस्थानकालीन शुक्रवार पेठ तालीम इमारत विस्तार, जुन्या इमारतीची दुरुस्ती, अन्य विकास कामासाठी नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया) व सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी नगर परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलेल्या १५ लाख रुपयांच्या निधीतील विकास कामांचा शुभारंभ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) व श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) बोलत होते.
        श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब नियमित तालमीमध्ये येऊन पैलवानांची विचारपूस करीत असत, काहीवेळा कुस्ती पाहण्यासाठी थांबत त्यासाठी तालमीमध्ये एक ओटा तयार करुन त्यावर महाराजसाहेब यांच्यासाठी खास बैठक (गादी) तयार करण्यात आली होती, याची आठवण म्हणून सदर बैठकीवर श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब बसले असून शेजारी पैलवान व मान्यवर असल्याचा एक जुना दुर्मिळ फोटो श्रीमंत संजीवराजे (बाबा), श्रीमंत विश्वजीतराजे (बाबा) यांना भेटीदाखल देण्यात आला, संस्थान काळापासून शुक्रवार पेठ तालमीने कुस्ती व अन्य खेळांची परंपरा जपली असून येथून उत्तम पैलवानांप्रमाणे उत्तम कब्बडी पटू निर्माण झाल्याची माहिती देत या तालमीत हिंदकेसरी पै.मारुती माने, श्रीरंग पैलवान यांनी कुस्तीचे धडे दिले आहेत, याची आठवण करुन देत आपल्याकडे मातीवरील कुस्तीमध्ये अनेकांनी प्राविण्य मिळविले आहे, तथापी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये मॅटवरील कुस्तीला प्राधान्य दिले जात असल्याने त्या प्रकारचे शिक्षणही येथे दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केली.
        सातारा जिल्ह्यातील पट्टीचे, तरबेज पैलवान खाशाबा जाधव, पै.श्रीरंग जाधव, पै.के.डी.मानगावे यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकाचवेळी भारताचे प्रतिनिधित्व केले, त्यामध्ये पै.खाशाबा जाधव यांनी ब्रॉंझ पदक मिळविले, तसेच पै.मारुती माने यांनी एशियाडमध्ये फ्री स्टाईल प्रकारात सुवर्णपदक तर ग्रीकरोमन प्रकारात सिल्व्हर मेडल एकाचवेळी मिळविले असल्याची आठवण करुन देत येथे दोन्ही प्रकारच्या कुस्ती प्रकारात प्रशिक्षण देण्याची आवश्यकता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी व्यक्त केली.
        अलिकडे मानवी आरोग्य अत्यंत चिंताजनक झाले असल्याने प्रत्येकाने आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत लहान वयात गंभीर आजार होत असल्याने कुस्ती मध्ये सर्वांनाच प्राविण्य मिळविता आले नाही, तरी कुस्तीमधील व्यायाम, मेहनत, शिस्त, आहार यामुळे आरोग्य निरोगी ठेवून शरीर प्रकृती उत्तम राखणे शक्य असल्याने लहान वयापासून तालमीतील व्यायाम उत्तम व्यायाम असल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी सांगितले.
        प्रारंभी वस्ताद पै.राहुल सरक यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात तालीम इमारत विस्तार, इमारत दुरुस्ती, नूतनीकरण व अन्य कामासाठी १५ लाख रुपये फलटण नगर परिषदेने मंजूर केले असून त्यामधून ही कामे होणार असल्याचे निदर्शनास आणून देत त्यासाठी नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैया), नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी आपल्या फ़ंडातील रक्कम उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.
        या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, मा.नगरसेवक सुदामराव मांढरे, मा.नगरसेवक चंद्रकांत शिंदे, मा.उपनगराध्यक्ष संजय पालकर, जेष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, पत्रकार सुभाष भांबुरे, नासिरभाई शिकलगार, राहुलभैय्या निंबाळकर, कनिष्ठ अभियंता संजय सोनवणे साहेब, मा.नगरसेवक फिरोज आत्तार, बापूराव आहेरराव, आबा बेंद्रे, महंमद शेख, चंद्रकांत पालकर, ताजुद्दीन शेख, गणेश पालकर, निलेश खानविलकर, सनी शिंदे, पप्पू शेख, अभिजीत जानकर, राहुल निंबाळकर, बंटी गायकवाड, संजय हिंगे, भास्कर ढेकळे, पप्पू मांढरे, राजाभाऊ देशमाने, विकी शिंदे, कांताशेठ नाईक, वसीम मणेर, सनी पवार, गोरख पवार, राकेश तेली, राहुल शहा, अमीर सय्यद, संदीप कर्वे, भाऊ कापसे, कॉन्ट्रॅक्टर संदीप जाधव यांच्या सह तालमीतील ७०/८० पैलवान, शुक्रवार पेठेतील कुस्ती प्रेमी नागरिक उपस्थित होते. रहीम तांबोळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, समारोप व आभार प्रदर्शन केले.

No comments:

Post a Comment