जिल्हा परिषदेतील गुरुजींच्या मुलाचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, February 8, 2021

जिल्हा परिषदेतील गुरुजींच्या मुलाचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश.

जिल्हा परिषदेतील गुरुजींच्या   मुलाचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश.

बारामती : - देसाई इस्टेट  मधील रहिवासी श्री.सुरेश पांढरे व सौ.संगीता पांढरे हे दोघेही जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा श्री.तेजस सुरेश पांढरे हाही इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी. इयत्ता चौथी व सातवीला स्कॉलरशिप मिळवलेला हा गुणवंत विद्यार्थी होय. सतत अभ्यासात मग्न असणाऱ्या या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC)  परीक्षा उतिर्ण होऊन CAPF हे पद मिळवून देशात 46 सावी रँक मिळवलेली आहे. देसाई इस्टेट परिसरातून श्री.तेजस सुरेश पांढरे व त्याचे पालक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 
खरे तर नेहमी यश प्राप्त करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येतो परंतु त्यास मार्गदर्शन करणारे व प्रोत्साहन देणारे पालकांचा सत्कार होत नाही. खरे तर प्रत्येकाचे पाहिले गुरू आई - वडील असतात म्हणून बारामती शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष माननीय विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराच्या वतीने  श्री सुरेश पांढरे (गुरुजी) व सौ संगीता पांढरे या यशस्वी पालक व आई - वडिलांचा  शाल, श्रीफळ, व फेटा बांधून सत्कार  करण्यात आला*.
या प्रसंगी माननीय विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराचे सदस्य श्री शंकर घोडे सर, सोनवणे सर, गोफणे गुरुजी, प्रवीण शेठ बोरा, डॉक्टर चोपडे, सतीश कोडलिंगे,  सुनील कदम, सचिन (बंडा) मोरे, सुरेश झगडे, कशिम शेख, मंगेश गिरमे,नमदास गुरुजी, मधुकर काळे, नितीन मोरे, गावडे दादा, अतुल पवार, सागर मोहिते,  श्याम शेवाळे, इरफान बागवान, कुंदन आवळे, निशू शेंडगे, हिमांशू गालिंदे, अरुण भैय्या जाधव, राहुल नाळे, अक्षद शहाणे, स्नेहल कांबळे, विवेक भंडारे, बंटी लाळगे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment