दोन पत्नींना घेऊन राहणार्या एका रिक्षा चालकाने एका पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून केली गळफास घेऊन आत्महत्या... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, February 27, 2021

दोन पत्नींना घेऊन राहणार्या एका रिक्षा चालकाने एका पत्नीचा कुऱ्हाडीने खून करून केली गळफास घेऊन आत्महत्या...

दोन पत्नींना घेऊन राहणार्या एका रिक्षा चालकाने एका पत्नीचा  कुऱ्हाडीने खून करून केली गळफास घेऊन आत्महत्या...                                                                                            पुणे : कात्रज परिसरात दोन पत्नींना घेऊन राहणार्या एका रिक्षा चालकाने एका पत्नीचा कुन्हाडीने वार करून खून केल्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून हा प्रकार घडला आहे.दोघीही सख्या बहिणी होत्या.
अनिता तुकाराम कोरे (वय 32) असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर तुकाराम गंगाराम कोरे (वय 40) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत दुसरी पत्नी जगदेवी कोरे(वय 38) यांनी भारती विद्यापीठ पोलीिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुकाराम हा रिक्षा चालक आहे. तो कात्रज येथील मांगडेवाडी परिसरात राहत होता. त्याला दोन बायका आहेत. अनिता ही दुसरी पत्नी होती. तर पहिली जगदेवी होती. तो दोन्हीसोबत राहत होता. तिघेही एकत्र राहत होते.दरम्यान, तो दुसरी पत्नी अनिता हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. काल (शनिवार)रात्री देखील त्यांच्यात यावरून वाद झाले.यावेळी त्याने मध्यरात्री कु्हाडीने वार करत खून केला. यानंतर स्वत: खोलीत गळफास घेऊनआत्महत्या केली. सकाळी जगदेवी या उठल्या त्यांनी झाडझुड केली असता त्यांना हा प्रकार दिसून आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.

No comments:

Post a Comment