बारामती शहर पोलीस स्टेशनने दाखविले माणुसकीचे दर्शन, दिव्यांग व्यक्तीस नविन वर्षाची अनोखी भेट...
बारामती:-बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिव्यांग तक्रारदार श्री. मधुकर हिरामण वायकर रा.माळेगाव बू। ता.बारागती जि.पुणे यांना त्यांनी दिव्यांग व्यक्तीसाठी वापरण्यात येणारी तिन चाकी टि.व्ही.एस कंपनीची मोपेड मोटर सायकल सन २०१९ मध्ये खरेदी केली असता व मध्यंतरीचे काळात कोरोना संसर्गाचे अनुशंगाने सर्व उद्योगधंदे बंद पडुन लोकांचा रोजगार बंद झाला होता.त्यामध्ये सदरचे तकारदार दिव्यांग यांना कोणताही रोजगार उपलब्ध न झाल्याने त्यांनी घेतलेल्या मोपेड मोटार सायकलचे हप्ते फायनांन्स कंपनीला भरू शकले नाही.त्यांना रोजगार उपलब्ध होत नसल्याने व फायनांन्स कंपनीने त्यांचे मागे फायनांन्सचे हप्ते भरण्यासाठी तगादा लागु लागल्याने व ते तक्रारी
अर्जात त्यांना रोजगार नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ आली असले बाबत नमुद केल्याने
बारामती शहर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. नामदेवराव शिंदे यांनी सदर तकार अर्जाची गांभीर्याने तात्काळ दख्वल घेवुन एक मदतीचा हात म्हणुन बारामती शहर पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व सर्व अंमलदार यांचेशी चर्चा करून एका दिव्यांग व्यक्तीला नविन वर्षाची अनोखी भेट म्हणुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने फायनांन्स कंपनीचे थकलेले २२,०००/- रूपये जमा करून फायनांन्स कंपनीचे अधिकारी यांना पोलीस स्टेशन येथे बोलावून त्यांना सदर दिव्यांग व्यक्तीचे मोटार सायकलची उर्वरीत थकलेली कर्जाची रक्कम देवून त्यांची गाडीचे कर्जातुन मुक्तता करून नविन वर्षाची एक आगळी वेगळी अनोस्खी भेट दिली आहे. अर्जदार श्री.मधुकर हिरामण वायकर यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अमंलदार यांची मनापुर्वक आभार मानले सदर घटनेचे बारामती शहरात नागरिकांकडुन कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment